Home मुंबई मनस्वी ग्रुपच्या वतीने शैक्षणीक मार्गदर्शन व साहित्य वाटप

मनस्वी ग्रुपच्या वतीने शैक्षणीक मार्गदर्शन व साहित्य वाटप

36
0

आशाताई बच्छाव

1000674570.jpg

मनस्वी ग्रुपच्या वतीने शैक्षणीक मार्गदर्शन व साहित्य वाटप

युवा मराठा न्यूज:- कार्यकारी संपादक विजय पवार.
मनस्वी ग्रुप या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.असाच एक उपक्रम हिरानंदानी ट्रस्ट सभागृह पोयंजे तालुका पनवेल येथील अदिवासी पाड्यातील तब्बल १० शाळेतील माध्यामिक विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य वाटप आयोजित करण्यात आले होते.
सदर शाळेतील लहान विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. व इयत्ते प्रमाणे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्याथांकडून समुहगीत, वकृत्व सराव असे उपक्रम राबविण्यात आले. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व या विषयांवर गाप्पा गोष्टींच्या माध्यामातून सखोल मार्गदर्शन करण्यात आहे.
या कार्यक्रमासाठी लोकमतचे समुह संपादक विजय बाबीस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते त्यांनी विद्यार्थांना अतिशय छान व साध्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले.” ही मुले उद्या संस्काराची व प्रगतीची बाग फुलवतील आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील. मनस्वी ग्रुपचा हा सामाजिक बांधिलकीची जबाबदारी ओळखून घेतलेला उपक्रम गौरवास्पद आहे मी त्यांचे कौतुक करतो असे उदगार त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमासाठी पनवेलचे गटशिक्षणअधिकारी सिताराम मोहिते शालेय पोषण आहार अधिक्षक नवनाथ साबळे हे सुद्धा उपस्थित होते. पनवेलचे केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी निंबाजी गिते यांनी विशेष सहकार्य केले.
मनस्वी ग्रुपच्या वतीने माजी जि. प. सदस्या आशाताई झिमुर व संस्थापक विजय झिमुर हे उपस्थित होते. “चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहताना आमचे समाजाप्रती असलेल्या नात्यांचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद आज होत आहे असे मत त्यांनी मनोगतात मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी भोसले मुख्याध्यापिका सुशिला लवटे, शिक्षिका, शिक्षक तसेच मनस्वी ग्रुपचे विश्वस्त सूर्यकांत गायकवाड,दिनेश झिमुर,शर्वरी जाधव, प्रियंका खांदे, सोनाली झिमुर, सिमा आहिरे, दिपा शिंदे यांनी अथक परिश्रम घेवून हा कार्यक्रम पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here