Home बुलढाणा सिंदखेड राजा तालुक्यात वासनागंध जिल्हा परिषद च्या शिक्षकाने केला चिमुरड्या मुली सोबत...

सिंदखेड राजा तालुक्यात वासनागंध जिल्हा परिषद च्या शिक्षकाने केला चिमुरड्या मुली सोबत लैंगिक छळ,बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ.आरोपी शिक्षक अटकेत.

60
0

आशाताई बच्छाव

1000672229.jpg

सिंदखेड राजा तालुक्यात वासनागंध जिल्हा परिषद च्या शिक्षकाने केला चिमुरड्या मुली सोबत लैंगिक छळ,बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ.आरोपी शिक्षक अटकेत.

युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुरडी मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना ता.२३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली त्यामुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे,आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्गशिक्षक होते.
वर्दडी बु येथील पालक व 3 मुलींनी पा सोबत थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतीत सविस्तर असे की,वर्दडी बु येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता १ ते ८ वर्ग आहेत.मागील एक वर्षापासून आरोपी शिक्षकांची नियुक्ती होवून कार्यरत होते.त्यांच्याकडे मागील वर्षी इयत्ता ३ चा वर्ग होता.यावर्षी वर्ग ४ था होता.
इयत्ता ४ थी ला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत,सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनीनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले. शिक्षक वाईट कृत्य करतच होता परंतु ही घटना वाढतच गेल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ऍड प्रदिप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्या पर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनागव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली,
त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा त्या चिमुरड्या मुली सोबत वर्दडी बु या शाळेला भेट दिली या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकां विरोधात विविध कलमांनवे गुन्हा दाखल केला असून या शिक्षकां विरोधात तालुक्यातील पालका मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.अप क 183/2024 कलम 64(2) (f) (1) (m),65(2), 76(1) (1)B.N. 5. सह कलम 4, 6,8,10,12 का.से.अ.प्र.अधि. 2012, सहजम 3(1) (w) (1) (1) (2) (v).3 (1) (R) (s) (w), गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम व ठाणेदार विनोद नरवाडे करत आहे.

Previous articleरिसॉर्टच्या नावाखाली सुरू होते अनधिकृत कॉल सेंटर अलिबाग पोलिसांनी केला फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश
Next articleसंतापजनक: वर्दडी बु ! च्या शाळा मास्तरांने केले तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here