Home रायगड रिसॉर्टच्या नावाखाली सुरू होते अनधिकृत कॉल सेंटर अलिबाग पोलिसांनी केला फेक कॉल...

रिसॉर्टच्या नावाखाली सुरू होते अनधिकृत कॉल सेंटर अलिबाग पोलिसांनी केला फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश

56
0

आशाताई बच्छाव

1000672145.jpg

रिसॉर्टच्या नावाखाली सुरू होते अनधिकृत कॉल सेंटर
अलिबाग पोलिसांनी केला फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश

३२ पुरुषांसह १ महिलेला केली अटक

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड जवळ असलेल्या परहूर गावाच्या हद्दीत ‘नेचर एज अलिबाग रिसॉर्ट’मध्ये अलिबाग पोलिसांनी गुरुवार, दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास छापा टाकून अनधिकृत कॉल सेंटरचा पर्दापाश् करत तब्बल ८५,४५,२००/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३२ पुरुष व १ महिला आरोपी यांना अटक केली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अलिबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी अलिबाग पोलीस पथकास मिळालेल्या माहीतीच्या आधारे परहूर गावाच्या हद्दीतील ‘नेचर एज अलिबाग रिसॉर्ट’ मध्ये अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी पथकासह जावून छापा टाकला असता सदर ठिकाणी रिसॉर्ट मधील हॉलमध्ये ७ लाकडी काउंटरवर ३१ संगणक लॅपटॉप, ३१ हेडफोन, ३१ किबोर्ड, १५ माउस, इन्व्हर्टर, ३१ खुर्चा, ५ चारचाकी वाहने व १ मोटारसायकल, व्हायफाय युनिट मोडेम व इतर लाकडी फर्निचर, ५५ मोबाईलसह एकुण ३३ आरोपी मिळुन आले.

याच दरम्यान या ठिकाणी असलेल्या आरोपींकडे अधिक प्रमाणात चौकशी करत असताना आवास येथील सुरेखारमळा येथील आठवण रिसॉर्ट मध्येही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता त्या रिसॉर्ट मधील आरोपी यांना सुगावा लागल्यामुळे त्यातील आरोपी पळून जात असताना त्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर इतर आरोपी पळून गेले.

यातील आरोपी हे बेकायदेशीर व अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या साहाय्याने संगणकावर लिंक व अॅपवरून आरोपी यांनी अमेरीकेतील नागरिकांशी संपर्क साधून यु. एस. फार्मा या अमेरीकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोबाईलद्वारे संभाषण करून व्हायग्रा, सीयालीस, लिवीट्रो या अमेरिकेत मनाई असलेले औषधे घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पेमेंट करीता गिफ्टकार्डचा वापर करावा, असे सांगून गिफ्टकार्ड घेवून ते कोणाच्या तरी सहाय्याने रिडीम करून ते पेमेंट (पैसे) हवालाव्दारे आरोपी रोहीत बुटाने याच्याकडे जमा केल्यावर ज्या औषधांसाठी अमेरीकन नागरीकांनी ज्या वर्णनाचे व ज्या नावाचे औषधांसाठी पेमेंट (पैसे) दिले व सदरचे औषधे आपण देवू शकत नाही याची माहीती व खात्री आरोपी यांना असतानाही आपण औषधे देवू, असे भासवून अमेरीकन नागरीकाकडून गिफ्ट कार्डव्दारे पेमेंट घेवून फसवणुक केली व ते पैसे हावालाव्दारे भारतीय चलनात आरोपी रोहीत बुटाने व इतर आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेवून अमेरिकेसह इतर परदेशी नागरीकांची फसवणूक करून अवैधरीत्या कॉल सेंटर चालवित असताना एकूण ८५,४५,२००/- रू. किंमतीचे मुद्देमालासह मिळुन आले असून त्यांच्या विरूध्द अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

सदर कॉल सेंटरवरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग विभाग विनित चौधरी यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोउनि. संतोष भुंडेरे, पोउनि. मराठे, सहा. फौ. पिंपळे, पोह. सुर्यवंशी, पोह. शेलार, पोह. झिराडकर, पोह. जोशी, पोह. पाटील, पोना. म्हात्रे, पोशि. पारधी, पोशि पाटील, मपोह. जाधव व मपोह म्हात्रे यांनी केली आहे.

या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडवून दिल्याने या भागात सुरू असलेल्या अनेक रिसॉर्ट, हॉटेल, कॉटेजेस, लॉज यांचीही कसून चौकशी केली तर अशा प्रकारचे अनधिकृत व अवैध आणि बेकायदेशीर धंदे व कारनामे उघड होण्याची शक्यता आहे, याबाबत पोलिसांनी आवश्यक ती चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी आजच्या घटनेवरून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here