आशाताई बच्छाव
महिला सि.एच.ओ च्या रात्री ड्युटी कशासाठी.?
डाॅ. उपलेंचवार यांची चौकशी करून तात्काळ बडतर्फ करावे. अन्यथा आंदोलन.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण.
गडचिरोली/ सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करुन डॉ . गजानन उपलेंचवार यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या मागणीची चर्चा आरोग्य विभागात सुरु आहे. गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभाग प्रशासनांतर्गत येत असलेल्या पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन उपलेंचवार यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व कर्मचारी त्रस्त झाल्याची चर्चा आहे. डाॅ. गजानन उपलेंचवार यांच्या भोंगळ कारभारामुळे आणि मनमानी कारभारामुळे त्रस्त झाल्याची चर्चा आहे. पोराला प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक कर्मचारी कार्यरत असुनही कंत्राटी महिला सिएचओ आणि एमपीडब्ल्यु कर्मचाऱ्यांची रात्री ड्युटी कशासाठी. ?? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्क , हक्क आणि अन्याया विरोधात काही बोलले तर मात्र डॉ.गजानन उपलेंचवार हे कर्मचाऱ्यांना शासकिय कामात अडथळा निर्माण करित असल्याचे नोटीस बजावण्यात आणि खुलासा मागण्यात तरबेज आहेत. रात्री…. बेरात्री काही कामं नसतांना कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर फोन करून दवाखान्यात बोलाविल्यास साधन नसल्याने आपल्या पतीला सोबत घेऊन जाणारच. मात्र डॉ गजानन उपलेंचवार यांच्या डोक्यात घुसत नाही . ही शोकांतिका म्हणावी लागेल.या डॉक्टरला वठणीवर आणण्यासाठी संबधीत सर्व जनहितार्थ सेवा देणाऱ्या संघटनेच्या वतीने संघटीत होऊन आंदोलन करण्याची गरज आहे. शासन, प्रशासनाने आणि जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाच्या वतीने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांसाठी चर्चा सुरू आहे. दिनांक २२ आगष्ट रोजी केवळ दैनंदिन डायऱ्या तपासणीसाठी मिटींग बोलविली होती. परंतु अचानक चारचाकी वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा भिषण अपघात झाला आणि गंभीर जखमी झाले.. तरीही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांने प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिनी डायऱ्या तपासणीचे काम सुरू ठेवले. अपघातामुळे गंभीर जखमी झालेल्यांची मदत करण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचारी डायरी तपासणीसाठी उपस्थित राहु शकले नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याची आणि नोटीस देण्याची धमकीही देण्यास हे वैद्यकिय अधिकारी विसरत नाही. यावरून डॉ गजानन उपलेंचवार हे किती मग्रूर असतील याची कल्पना येते.
या अपघातात दोन आरोग्य कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यात साखरा उपकेंद्र येथे कार्यरत असलेल्या सिएचऒ डॉ. सिमा ढवळे , कंत्राटी परिचारिका वैशाली कुळमेथे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. ती शस्त्रक्रिया तब्बल दोन तास असल्याचे डॉ सहारे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत आणि सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून , मनोधौर्य वाढविले. मात्र डॉ गजानन उपलेंचवार यांनी वेतन कपात करण्यात येणार असल्याच्या आणि नोटीस बजावण्यात येणार असल्याच्या धमक्या देत डायऱ्या तपासणीचे काम सुरू ठेवले.
या अपघातामुळे डॉ. उपलेंचवार यांच्या कुंकर्माची माहिती समोर आली. पुढे एकेक माहिती कथेच्या रुपाने बाहेर येण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यानिमित्ताने
डाॅ. उपलेंचवारांच्या बातम्याही वाचकांना रुचीने वाचायला मिळणार आहेत. . स्वतः डॉक्टर उपलेंचवार हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी राहत नाही. आणि उपकेंद्राची, पथकांची तपासणी करण्यासाठी मात्र रात्री सात वाजताच्या नंतरही तर कधी सकाळी आठ वाजताच्या अगोदरच भेट देऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मानहानी करण्यासाठी हा स्वतंत्र नियम याच डाक्टरसाठी तयार करण्यात आला का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.