Home पुणे विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

30
0

आशाताई बच्छाव

1000668781.jpg

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
पुणे,( उमेश पाटील ब्युरो चीफ): – Pune BJP |पुणे शहरात तसेच राज्यातील इतर भागात अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महिला मोर्चा, पुणे शहराच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केले. यात प्रामुख्यानेः
शहरातील सर्व शाळा चालकांची तातडीने बैठक घेऊन त्यांना विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात.
सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे Police Verification व चारित्र्य पडताळणी करण्यात यावी.
सर्व शाळांमधील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.
सर्व शाळांमध्ये पूर्ण वेळ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत.
आपल्या दामिनी पथकाचा प्रभावी वापर करुन त्यांच्या मदतीने या पद्धतीचे गुन्हे रोखता येतील का? याबाबत देखील सखोल विचार व्हावा.
आदी मागण्यांचा समावेश होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याबाबत अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे काम केले जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे. पुणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे देखील या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पुण्यातील पक्षाचे १०० माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतील. त्यासोबतच येत्या २९ ऑगस्टला शहर स्तरावर कार्यक्रम घेतला जाईल. यामध्ये सर्व संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी होतील. यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त या सर्वांना मार्गदर्शन
या शिष्टमंडळात भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्यासह भाजपा पुणे शहर सरचिटणीस वर्षा तापकीर, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , महिला मोर्चा सरचिटणीस शामा जाधव, उज्वला गौड, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे, स्वाती मोहोळ, खुशी लाटे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Previous articleलखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शेतकरी संघटना पंतप्रधानांना आक्रमकपणे विरोध दर्शविणार
Next articleतेली समाज बांधवांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय विकासाठी तेली समाजाचे एकत्रीकरण आवश्यक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here