Home भंडारा साकोली बंद 100 % यशस्वी विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी पक्षांचा सहभाग

साकोली बंद 100 % यशस्वी विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी पक्षांचा सहभाग

30
0

आशाताई बच्छाव

1000668273.jpg

साकोली बंद 100 % यशस्वी

विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी पक्षांचा सहभाग

 

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)
न्यायालयाच्या निर्णय विरोधात विविध संघटनांचे बुधवार २१ ऑगस्ट या भारत बंद मोहिमेला साकोली बंद 100 % टक्के यशस्वी होण्यासाठी विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. जूने पंचायत समिती गांधी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. बिरसा फाइटर चे सुरेश पंधरे, ऑल इंडिया पीपल फेडरेशनचे केशव भलावी, बि डी खांडवाये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, भारतीय बौद्ध महासभेचे साकोली अध्यक्ष विलास मेश्राम, समता सैनिक दलाचे साकोली कमांडर कैलास गेडाम, बहुजन समाज पार्टीचे मनोज कोटांगले बिट्टू गजभिये, तालुका स्मारक समितीचे दीपक साखरे ,अशोक रंगारी, मूलनिवासी संघटनेचे शब्बीर पठाण, बी आर एस पी चे शीलवंत मेश्राम ,काँग्रेसचे दिलीप मासुरकर, बामसेफचे कागदराव रंगारी, कार्तिक मेश्राम, माजी सभापती रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते चूनीलाल वासनिक, जगदीश रंगारी, नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष जगन उईके, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढून सभा संपन्न झाली
याप्रसंगी सुरेशकुमार पंधरे, केशव भलावी, जगन उईके, मनोज कोटांगले, डी जी रंगारी,प्रदीप मासुरकर, कैलास गेडाम ,विलास मेश्राम अशोक रंगारी व इतर मान्यवरांची सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जो निर्णय देण्यात आलेला आहे व तो कसा घटनाबाह्य आहे व आरक्षण ची का गरज आहे याविषयी आपल्या भाषणातून पटवून दिले
सर्व कॉलेज महाविद्यालय व्यापारी संघटनांनी समर्थन दिले पाठिंबा दिला सर्व व्यापारी संघटनेचे आभार मानण्यात आले
त्याली तालुका स्मारक समिती येथून प्रगणित कॉलनी चौक ते जुनी पंचायत समिती पर्यंत रॅली आली व त्यात सभेत रूपांतर झाले
कार्यक्रमाचे संचालन भावेश कोटागेले यांनी केले तर आभार सोनू राऊत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here