Home अमरावती शहरात राजापेठ मध्ये पुन्हा गॅंगवॉर खून का बदला खून से.

शहरात राजापेठ मध्ये पुन्हा गॅंगवॉर खून का बदला खून से.

95
0

आशाताई बच्छाव

1000667570.jpg

शहरात राजापेठ मध्ये पुन्हा गॅंगवॉर खून का बदला खून से.
दैनिक युवा मराठा
पी. एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथील केडिया नगर स्थिती उधाणासमोर गॅंगवर मधून झालेल्या घटनेची साई वाळतेना वाळतेच पुन्हा एकदा ग्यांग वर मधून एका गुन्हेगार तरुणाचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३०च्या सुमारास सातोना ते साईनगर रोडवर चांडक नाष्टा सेंटर भागात तो खुनी थरार घटना घडली. यश रोडगे वय २१ मराठा कॉलनी गोपाल नगर असे मृतकांचे नाव आहे पोलिसांना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास यश रोडगे यांचा मृत्यू देह भातकुली नाका परिसरातील कचरा डेपोच्या रोडच्या बाजूला असलेल्या नालीत आढळून आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबियांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
याप्रकरणी, मृतांचा मित्र तथा घटनेत जखमी झालेला आकाश रामटेके वय २१ गोपाल नगर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी काटे, श्रेयस आवटे, तक्षदीप इंगळे, मंथन पाडणकर, दीपक ठाकूर व अन्य दोन तीन जनाविरुद्ध गुरुवारी पहाटे चर्चा सुमारास खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व आर्म प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी यश रोडगेवर तलवार व चाकूने हल्ला करत त्याला दुचाकी वर बसवून शहरा बाहेर नेले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह नालीत फेकून देण्यात आला. तो शोधण्यासाठी राजापेठ पोलीस अमरावती, तसेच गुन्हे शाखा व विशेष पथक चार ते पाच तास कार्यारयात होते. अखेर रात्री तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. ६सप्टेंबर२०२३ रोजी रात्री गोपाल नगर अंकुश मेश्राम उर्फ लावा वय 22 म्हाडा कॉलनी याचे अपहरण करून खून करण्यात आला सप्टेंबर रोजी रात्री कोंडेश्वर जंगल भागात नावाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी सनी प्रधान यांच्यासह पाच ते सहा अल्पवयीन विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल केला होता. लावाच्या खुनात यश रोडगे चा सहभाग असल्याचा आरोप करत बुधवारी रात्री लावा प्रमाणे यश रोडगे चे अपहरण करण्यात आले. त्याचा मृतदेह शहरा बाहेर नेऊन टाकण्यात आला

Previous articleनिती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
Next articleअमरावती शहरात बदलापूर घटनेचा प्रडसाद, शिवसेना (उभाठा)चे राजकमल, जस्टम चौकात आंदोलन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here