आशाताई बच्छाव
गजानन पवार उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित..युवा ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न..!! वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)
समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी गेल्या दहा वर्षापासुन सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणारे पत्रकार गजानन पवार.यांना यावर्षी दिला जाणारा युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार रविवार दि १८. हिवरा संगम येथील राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांचा वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व सत्कार सोहळा रविवार दि १८. एकविरा देवी संस्थान हिवरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्कल नुसार युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या-मोठ्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने पत्रकाराची संघटना करून राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी जो विडा उचलेला आहे त्यास आज महाराष्ट्रात यश मिळाले आणि याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वोतोपरी मदत होत असल्याने या संघटनेत राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत. आणि एवढच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारत भर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करु असेही त्यांनी सांगितले. सदर राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार व सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचे माजी आ.राजेंद्र नजरधने प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साईनाथ महाराज माहूर व श्याम भारती महाराज माहूर. तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, कायदेविषयक सल्लागार रवींद्र जाधव तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघ वाशिम जिल्हाध्यक्ष करन धोंगडे, छ.संभाजीनगर.जिल्हाध्यक्ष गजानन काळे,परमेश्वर पेशवे व महिला पत्रकार जयश्री घोडके,माधुरी कटकोजवार. व वाशिम जिल्ह्यातील सापळी येथील सुपुत्र गजानन पवार यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे,यावेळी गजानन पवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार सर तसेच राज्य दैनिक बाळकडू चे संपादक सन्माननीय दीपकजी खरात गुरुजी, एम.डी सुरोशे व करन धोंगडे यांचे आभार मानले, गजानन पवार यांना विविध सामाजिक शैक्षणिक,राजकीय पत्रकार, मित्रमंडळी कडून शुभेच्छा व अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला आहे.