Home अमरावती पश्चिम विदर्भात पाणीसाठा ७५.६९ टक्क्यावर; विभागातील १८ मोठ्या व माध्यम प्रकल्पातून विसर्ग,...

पश्चिम विदर्भात पाणीसाठा ७५.६९ टक्क्यावर; विभागातील १८ मोठ्या व माध्यम प्रकल्पातून विसर्ग, धरणा मधून पाणी सोडून देण्यात येत आहे.

26
0

आशाताई बच्छाव

1000661296.jpg

पश्चिम विदर्भात पाणीसाठा ७५.६९ टक्क्यावर; विभागातील १८ मोठ्या व माध्यम प्रकल्पातून विसर्ग, धरणा मधून पाणी सोडून देण्यात येत आहे.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावतीजिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
पश्चिम विदर्भातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचे आवक वाढली आहे. त्यामुळे तीन मोठ्या प्रकल्पासह एकूण १८ प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विभागातील सर्व सिंचन प्रकल्पामधील पाणीसाठा हा ६५.६९ टक्क्यावर पोहोचला आहे. अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुधडी भरून वाहत आहे. अमरावती विभागातील सर्वात मोठा अप्पर वर्धा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२४ मीटरवर पोचली आहे. धरणामध्ये ४५५.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा (८०.८२) आला आहे. धरणाचे ५ दरवाजे हे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, १९६क्युसेक पाणी सोडल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस आणि बेंबळा या प्रकल्पामधून पाणी सोडण्यात येत आहे. बेंबळा नदी दुधडी भरून वाहत आहे. बेंबडा प्रकल्पाचे२ दरवाजे २५.सें.मी. उघडले आहेत. विसर्ग ४२क्युसेक एवढा आहे. पुस प्रकल्पातून१९.२५ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५सें.मी. उघडले आहेत. या धरणातून ४८.२२क्युसेक विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भातील एकूण २७ पैकी १४ मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा, सपन, गरगा, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस, सायखेडा, गोकी वाघाडी, बोरगाव या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, घुंगशीबॅरेज तसेच वाशिम जिल्ह्यातील अडाण, सोनल आणि बुलढाणा जिल्ह्यातील मस या मध्यम प्रकल्पामधूनही विसर्ग सुरू आहे. मागील अनेक दिवसापासून पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस पडला आहे. परिणामी पश्चिम विदर्भात बहुतेक प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्वाधिक विसर्ग उध्व्र वर्धा प्रकल्पातून होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here