Home भंडारा आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न

आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न

26
0

आशाताई बच्छाव

1000655914.jpg

आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- आयुष्मान आरोग्य मंदिर लाखोरी (आयुष ) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नुकताच घेण्यात आला.
आरोग्य शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन लाखोरी येथील पंचायत समिती सदस्य सुनील बांते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चेटुले, ग्राम पंचायत सदस्य विलास बांते व मार्गदर्शक म्हणून
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, सालेभाटा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कमाने, लाखोरी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. पितांबर तलमले, योगा प्रशिक्षक सुनील भाग्यवानी इत्यादी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. व
उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आले. सर्व उपस्थित नागरिकांना आयुर्वेद व त्याचे फायदे या विषयावर माहिती देण्यात आली. जेष्ठ नागरिकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच अतिथींच्या हस्ते आयुष्मान आरोग्य मंदिर परिसरामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करून आरोग्य तपासणी मध्ये व्याधीग्रस्त नागरिकांना आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, वातविकार संधी विकार, नेत्र विकार, रक्तालपता अशा प्रकारचे चिकित्सा उपक्रम राबवण्यात आले. या शिबिरामध्ये १४२ लाभार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
त्यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नवीन डेकाटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष अधिकारी लाखोरी डॉ. पितांबर तलमले, आयुष अधिकारी राजेगाव डॉ. अर्चना सोनटक्के, समुदाय आरोग्य अधिकारी लाखोरी कु. नेहा सूर्यवंशी समुदाय आरोग्य अधिकारी राजेगाव डॉ. कु. शितल रामटेके समुदाय आरोग्य अधिकारी सोमलवाडा डॉ. कु. सुचिता शेंडे तसेच आरोग्य सेविका लाखोरी माधुरी लिमजे, कांचन चेटुले, आरोग्य सेविका सोमलवाडा कु. लता किंदरले, आरोग्य सेवक गुलाब कावळे, नेत्र तपासणी ओपथालमिक अधिकारी सौ. नादिरा मेश्राम व सर्व आशा वर्कर उपकेंद्र लाखोरी परिचर गीताबाई आणि अनिताबाई यांच्या सहभागाने आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आला.

Previous article“अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” हाच संपूर्ण व्यसनमुक्तीचा पर्याय – पुरूषोत्तम भिवगडे
Next articleरक्षाबंधनाचा बहिण -भावाच्या प्रेमाचा पवित्र सण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here