Home अमरावती अखेर शिलोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन.

अखेर शिलोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन.

92
0

आशाताई बच्छाव

1000652516.jpg

अखेर शिलोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन.
दैनिक युवा मराठा.
नि.जाधव.
अमरावती/नांदगाव खंडेश्वर.
१२ ऑगस्ट २०२४ रोजी शिलोडा येथील शेकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती, श्री अमरभाऊ काळे खासदार वर्धा लोकसभा शेत्र, आयुक्त कार्यालय अमरावती यांना निवेदन दिले. गेल्या आठ वर्षांपासून शिलोडा गावातील सर्व शेतकरी व नागरिक शिलोडा ते सावंगा गुरव ह्या दोन गावांना जोडणारा रस्ता व या रस्त्यावर असणाऱ्या जळू नाल्या वरील पुलाची प्रतिक्षा करत आहे. सन २०१६ मध्ये शिलोडा गावा लगत असलेल्या जळू नाल्याचे खोलीकरण झाले. खोलीकरण झाल्यामुळे नाल्याची खोली व रुंदी वाढविण्यात आली त्यामुळे जळू नाल्या मध्ये सतत १० ते १५ फूट पाणी राहते. ह्या रस्त्यावर गवतील ७५ टक्के शेतकऱ्यांची शेती आहे ह्या वर्षी सतत सुरू असलेल्या पावसमुळे शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी केली तेव्हापासून शेतात जायला मिळालेच नाही व काही प्रमाणात शेतकऱ्यांना तर शेती पेरताच आलेली नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पळीत पडलेली आहे. त्याकरिता हा रस्ता व पुल आम्हा शेतकऱ्यान साठी व नागरिकांना अती आवश्यक आहे. ह्या अगोदर आम्ही माजी खासदार श्री रामदासजी तडस व सद्याचे आमदार श्री प्रतापदादा अडसड यांना ४ ऑगस्ट २०२० ला निवेदन दिले होते. आमदार श्री प्रतापदादा अडसड यांनी आम्हाला १२ ऑगस्ट २०२० ला लेखी स्वरूपात पत्र सुध्धा पाठविले होते की ह्या दोन गावांना जोडणारा रस्ता व जळू नाल्यावरील पुल लवकरात करून देण्यात येईल. परंतु आज त्यांच्या पत्राला सुध्धा येऊन ४ वर्ष झाली पण पुल व हा रस्ता अद्यापही झालेला नाही. तरी आपण आमची समस्या लक्षात घेऊन जळू नाल्यावरील पुल व शिलोडा ते सावंगा गुरव रस्ता लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावा. अन्यथा आम्ही सर्व शिलोडा ग्रामवासी येत्या १५ ऑक्टोंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकी वर बहिष्कार टाकू असे ह्या निवेदन मधुन सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे अधीक्षक यांनी आश्वासन दिले की आपली मागणी चौकशी करून पूर्ण करून दिली जाईल.
आयुक्त कार्यालय अमरावती येथे श्री संजय पवार उप आयुक्त यांनी पण आश्वासन दिले की लवकरात लवकर ह्या निवेदन वर दखल घेऊन आपणास कळविण्यात येईल. श्री अमरभाऊ काळे यांनी पण आश्वासन दिले की तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकतो, तुमची ही पुल व रस्ता मागणी पूर्ण करून तयार करून देईल.
सर्वात शेवटी शिलोडा व सावंगा गुरव येथील शेतकरी श्री अनीलभाऊ बोंडे राज्य सभा खासदार अमरावती यांच्या कडे निवेदन देण्या करीता गेले असता बोंडे साहेबांनी मोबाईल वरून ह्या पुल व रस्ता ची चौकशी केली व चौकशी मध्ये असे आढळून की त्या रस्त्याला अद्यापही ग्रामीण मार्ग क्रमांक मिळालेलाच नाही. सन २००९ मध्ये हा रस्ता पांदन रस्ता मंजूर करून मतिकरन चा करण्यात आला त्यावेळी रोहना ग्राम पंचायत ने ह्या रस्त्या करीता ग्रामीण मार्ग क्रमांक ची मागणी केली होती, पुन्हा २०१७ मध्ये सुद्धा केली होती व मागील वर्षी २०२३ मध्ये पण केलेली आहे तरी पण अद्याप त्या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक मिळाला नाही. ग्रामीण मार्ग क्रमांक नसल्यामुळे मुळे श्री अनिलभाऊ बोंडे यांनी असे म्हटले की मी ह्या रस्ता व पुला करीता काहीच करू शकत नाही व मी तुमचे निवेदन पण घेऊ शकत नाही त्याकरिता आपण हे निवेदन वापस घेऊन जावे व जेव्हा त्या रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक मिळेल तेव्हा मला निवेदन सादर करावे.
बोंडे साहेबांनी ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे गावकऱ्यांची चिंता आणखी वाढलेली आहे. निवेदन सादर करताना शीलोडा गावातून प्रज्वल चौधरकर, दिलीप ढोकणे, विजय वानखडे, हितेश ढोकणे, प्रणव तामबसकर, गजानन स.सवटे, सचिन पाटील, देवसिंग दळवी, गजानन गु. सवटे, गौरव सवटे, संदीप इंगोले. सावंगा गुरव गावातून शंकर पवार, दिनेश पवार, हेमंत काळमेघ, गोलु सवाई, गजानन बनसोड. हे सर्व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here