आशाताई बच्छाव
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पालिकेतील करनिरीक्षकाला 20 हजारांची लाच घेतांना अटक.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार शहराच्या हद्दीत घेतलेल्या प्लॉटची पालिकेच्या असेसमेंट रजिस्टरला नोंद घेण्यासाठी एकास २५ हजारांची लाच मागत तडजोडीत २० हजार रुपये स्वीकारणाऱ्या करनिरीक्षक अनवरशा कासमशा फकीर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले. एका व्यक्तीने लोणार हद्दीत प्लॉट घेतला होता.
त्याची असेसमेंट रजिस्टरला त्यांना नोंद करावयाची होती. परंतु, पालिकेच्या करनिरीक्षकांनी त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली होती. परंतु, लाच द्यावयाची नसल्याने संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत २५ हजारांऐवजी २० हजार रुपये घेण्याबाबत तडजोड झाली. १४ ऑगस्ट रोजी अनवरशा (रा. पटेल नगर, लोणार) याला लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली.