Home मुंबई 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होणार संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होणार संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

43
0

आशाताई बच्छाव

1000651069.jpg

22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होणार संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे_ प्रवीण गायकवाड

मुंबई( संजीव भांबोरे) 22 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईत होणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्र धर्म जागविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेशचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश भोसले यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले..याबाबत सविस्तर वृत्त असे की ,महाराष्ट्राचा इतिहास ,सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात गेली सत्तर वर्षे सातत्याने काम करून मराठा बहुजन समाजात वैचारिक बदल घडवून आणणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले असून गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी वाशी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अधिवेशन होणार आहे .या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ,विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संभाजी ब्रिगेडच्या बदलाचा मागवा व भविष्याचा वेद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व अधिवेशनाचे निमंत्रक प्रवीणदादा गायकवाड यांनी केलेले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार रोहित पवार ,खासदार अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे ,तसेच सिने अभिनेते सयाजी शिंदे ,निखिल चव्हाण व गौरव मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. पहिल्या सत्रामध्ये पत्रकार अभिजीत करंडे हे गोष्ट पैशापाण्याची या विक्रमी पुस्तकाचे लेखक प्रफुल वानखेडे यांची मुलाखत घेणार आहेत .तर दुसऱ्या सत्रामध्ये जेष्ठ संपादक श्रीराम पवार हे महाराष्ट्र धर्म काय शिकवितो या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .तिसऱ्या सत्रामध्ये निर्मित पत्रकार निरंजन टकले हे गांधीजीच्या स्वप्नातील भारत या विषयावर संबोधित करणार असून लेखक चंद्रकांत जटाले या सत्रासाठी उपस्थित राहणार आहेत .चौथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार असून खासदार भास्कर भगरे व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सोळुंके हे उपस्थित असणार आहेत. अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विषयी उपस्थितीत कोल्हापूरचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शाही सन्मान सोहळा पार पडणार आहे. तसेच वरील मान्यवरांच्या हस्ते ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार ,सह्याद्री फार्म नाशिकचे मॅनेजमेंट डायरेक्टर विलास शिंदे व सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मगर यांना विश्वभूषण कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .वरील अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सागर भोसले विभागीय अध्यक्ष मुंबई अजय सिंह सावंत ,प्रदेश संघटक सचिन देसाई ,प्रदेश संघटक सुधीर भोसले ,प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रदेश अध्यक्ष यांनी केलेले आहे.

Previous articleरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज — खासदार डॉ. प्रशांत पडोळे
Next articleमुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी दाखवली माणुसकी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here