Home भंडारा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज — खासदार डॉ. प्रशांत पडोळे

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज — खासदार डॉ. प्रशांत पडोळे

44
0

आशाताई बच्छाव

1000651065.jpg

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज —
खासदार डॉ. प्रशांत पडोळे

भंडारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) : नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या कीटकनाशक मुक्त आहेत
रोगप्रतिकारक शक्ती वाढी सोबतच अनेक व्याधींवर गुणकारी आहेत.
रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. सध्या श्रावणात शेतशिवारात जंगलात अनेक ठिकाणी रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक महत्वपूर्ण जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांकडे अनेकांचा कल वाढला आहे. कोणत्याही औषधाची फवारणी न करता बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगली ओळख आहे.
या रानभाज्यांचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग भंडारा व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), भंडारा,ग्रामिण जीवोन्नती अभियान(उमेद)यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन दिनांक १३.८.२०२४ ला इंद्रलोक सभागृह,भंडारा येथे आयोजन करण्यात आला होते.

सदर रानभाजी महोत्सवाचे उदघाटन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन लिना फलके, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ,उपविभागीय कृषि अधिकारी किशोर पात्रीकर,कृषि उपसंचालक पद्माकर गिदमारे,तंत्र अधिकारी भंडारा, मनीषा पाटील,नोडल अधिकारी स्मार्ट, शांतीलाल गायधने, तालुका कृषि अधिकारी,भंडारा अशोक जिभकाटे,मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी,भंडारा वृषाली देशमुख, कृषि अधिकारी मुकूंद खराबे,तंत्र अधिकारी दीपक लोंढे,कृषि भूषण सेंद्रिय शेती तानाजी गायधने, प्रगतिशील शेतकरी मधुकर भोपे,तसेच ग्रामिण जीवोन्नती अभियान भंडाराच्या महिला गट व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवात रानातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या जवळपास ५२ प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनामध्ये ठेवून त्यांचे महत्व प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा उर्मिला चिखले यांनी यांनी समजावून सांगितले.

रानभाज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असून विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असल्याने या रानभाज्या सकस असल्याचे सांगितले.

रानभाज्यांचे आहारातील महत्व तांदुळजा भाजी ‘क’ व ‘अ’ जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते. फांद भाजी ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त आहे. अंबाडी भाजी क’ व ‘अ’ जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात.
गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हैसवेल भाजी ‘अ’ जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी आहे.

सदर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन तंत्र अधिकारी, योगेश राऊत यांनी केले तर प्रास्ताविक प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा उर्मिला चिखले यांनी केले.
विशेषतः सदर महोत्सवात सहभागी गटांना,शेतकऱ्याना रानभाजी महोत्सव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर महोत्सवात १२००० रुपयांची शेतकऱ्यांनी राभाज्यांची विक्री केली (काटवल,पातूर,बांबू वासते,सात्या,वराकली,खपरखुट यांची विशेष विक्री.)
आहार तज्ञ डहाके मॅडम यांनी रानभाजीचे आरोग्यासाठी महत्व आणि असलेल्या गुणधर्म, पाककला याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर महोत्सव उत्तम आणि नियोजनपूर्वक करण्याकरिता कृषि अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, आत्मा अंतर्गत अधिकारी कर्मचारी, स्मार्ट अंतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामिण जीवोन्नती अभियान अंतर्गत विभाग समन्वयक, कृषि, पशू सखी,आत्मा अंतर्गत गट,शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महोत्सव योग्यरित्या पार पडला.
महोत्सवाचे आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे यांनी केले.

Previous articleमाहोरा येथे कोलकत्ता येथील महिला डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येचा डॉ. असोसिएशन वतीने निषेध..
Next article22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होणार संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here