Home बीड परळीत अवजड वाहनांची वाहतूक जिरेवाडी बायपास मार्गे करावी; अन्यथा तीव्र आंदोलन- अँड.मनोज...

परळीत अवजड वाहनांची वाहतूक जिरेवाडी बायपास मार्गे करावी; अन्यथा तीव्र आंदोलन- अँड.मनोज संकाये

36
0

आशाताई बच्छाव

1000619691.jpg

परळीत अवजड वाहनांची वाहतूक जिरेवाडी बायपास मार्गे करावी; अन्यथा तीव्र आंदोलन- अँड.मनोज संकाये

संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना मित्र मंडळाच्यावतीने निवेदन सादर!

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०७  रोजी अवजड वाहनांची वाहतूक सुलभ पणे करता यावी म्हणून जिरेवाडी मार्गे बायपासची निर्मिती करण्यात आली. परळी शहरांमध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. वाहतूक कोंडी ही एक जटील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवजड वाहनांची वाहतूक जिरेवाडी बायपास मार्गे करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली असून मागणीचे निवेदन परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना मित्र मंडळाच्या वतीने सादर केले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, परळी शहरांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अवजड वाहनांची वाहतूक शहरात मोठ्या प्रमाणावर होते. याचा ताण पोलीस प्रशासनावर येतो. मालवाहतुकीची वाहने, राखेचे टँकर इतर लहान-मोठे वाहने याची वाहतूक होते. या वाहतुकीमुळे शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले आहे. राखेचे टँकर राखेची वाहतूक करत असताना ती ताडपत्रीने झाकली जात नसल्यामुळे राख उडून नागरिकांना डोळ्याचे आणि श्वसनाचे विकार जडत आहेत. पोलीस प्रशासनाचा ताण कमी व्हावा म्हणून प्रशासनाने ह्या अवजड वाहनांची जिरेवाडी बायपास मार्गे वाहतूक करावी अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पिसे, अनिल चौधरी, राम जोशी,राहुल कांदे, गिरीश सलगरे, शिवा बडे, काशिनाथ सरवदे, मुंजाभाऊ साठे, अनिल मिसाळ, कैलास रिकिबे, पत्रकार मोहन चव्हाण, संतोष कांदे, संतोष कांबळे, सुंदर आव्हाड, सुरेंद्र परदेशी, राजीव कसबे, वैजनाथ केंद्रे, आकाश जोगदंड, सदाशिव गोडे, परमेश्वर कसबे, विनोद रोडे, प्रमोद पुरी, वसंत मुंडे, अर्जुन गिरी , अनंत कातकडे, गोविंद कांदे, योगेश मुंडे, गजानन पांचाळ, बालाजी मुंडे ,जयसिंग रोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here