Home जळगाव पिठाच्या गिरणीतून मोबाईलसह रोकड लांबवणार्‍या चोरट्यास अटक

पिठाच्या गिरणीतून मोबाईलसह रोकड लांबवणार्‍या चोरट्यास अटक

100
0

आशाताई बच्छाव

1000614446.jpg

पिठाच्या गिरणीतून मोबाईलसह रोकड लांबवणार्‍या चोरट्यास अटक

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शिवाजी चौकातील जोगेश्‍वरी पापड व पिठाच्या गिरणीतून मोबाईलसह रोकड चोरून नेणार्‍या धुळ्यातील चोरट्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शिवाजी चौकातील जोगेश्‍वरी पिठाच्या गिरणीतून 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व रोख 3320 रूपये असा सुमारे 10 हजार 320 रूपयांचा ऐवज चोरीची घटना शनिवार 3 रोजी घडली होती. याप्रकरणी विनोद प्रकाश बारी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकातील हवालदार राहूुल सोनवणे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्‍वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन यांच्या पथकाने करून चोरट्याचा शोध घेतला असता चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागे परिसरात संशयित आनंद राजेंद्र सरोदे (45) रा. गल्ली नं.7, पारोळा रोड, धुळे हा हाती लागला. त्याचे ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला. तपास राहूल सोनवणे व ज्ञानेश्‍वर पाटोळे करीत आहेत.

Previous articleसाकोली तुमसर बस एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करा-
Next articleमी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here