Home भंडारा साकोली तुमसर बस एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करा-

साकोली तुमसर बस एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करा-

33
0

आशाताई बच्छाव

1000614440.jpg

साकोली तुमसर बस एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करा-

भावेश कोटांगले यांचे आगारप्रमुख यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)मक्कीटोला येथील पुल वाहून गेल्याने सध्या बंद असलेली साकोली तुमसर बससेवा एकोडी किन्ही सालेभाटा परसोडी उसगाव सोनेगाव मार्गे सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी नुकतेच साकोली आगारप्रमुख यांना दिले आहे.

साकोली तुमसर मार्गावर मक्कीटोला येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते. परंतु मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला वळणमार्ग पूर्णपणे वाहून गेल्यामुळे त्या मार्गावर चालणारी साकोली तुमसर बससेवा बंद आहे.उसगाव, सोनेगाव, मक्कीटोला, चांदोरी येथून अनेक विद्यार्थी एकोडी येथील कामाई करंजेकर विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, निर्धनराव वाघाये महाविद्यालय, सर्वांगीण शिक्षण विद्यालय तसेच साकोली येथील विविध विद्यालयात  येणे जाणे करीत असतात.परंतु सदर मार्ग बंद असल्याने साकोली तुमसर बससेवा बंद आहे. त्या मार्गावरील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी बस नसल्याने सलग पंधरा दिवसांपासून विद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याची दखल घेऊन एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी साकोली आगार प्रमुख सचिन आगरकर यांचेशी संवाद साधून निवेदन दिले व त्या परिसरात तुमसर बस ही एकोडी , किन्ही, सालेभाटा, परसोडी, उसगाव , सोनेगाव, तुमसर या मार्गाने सुरू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी केली.

Previous articleवयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’ ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’
Next articleपिठाच्या गिरणीतून मोबाईलसह रोकड लांबवणार्‍या चोरट्यास अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here