Home भंडारा वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’ ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री...

वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’ ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

370
0

आशाताई बच्छाव

1000614438.jpg

वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’

ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

. संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)वैनगंगा नदीच्या कुशीत दडलेल्या
ग्रामीण भागात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरीकांच्या दारात शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी शिवनाळा येथील समाज सेवेचा ध्येयवादी असलेला प्रफुल्ल ढेंगरे नामक युवक नागरिकांसाठी सरसावला आहे.

प्रफुल्ल या ध्येयवेड्याने सामाजिक क्षेत्रात उडी घेत शासनाने सुरु केलेल्या वयोवृद्धासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फार्म स्व खर्चातुन निःशुल्क भरून देत आहे. त्यात तालुक्यात ग्रामीण भागात राहत असलेल्या वृध्द ज्येष्ठ नागरीकांना सदर योजने विषयी माहिती पटवुन देत प्रत्येक गावातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फार्म भरून घेत आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरीकांच्या चेहऱ्यांवर आनंदाश्रु दाटुन येत आहेत. ‘प्रफुल्ल ने आपल्या स्व खर्चातुन तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्थानासाठी, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना मिळवुन देत समाजसेवेचे व्रत सुरू केले आहे. तालुक्यातील शिवनाळा, भेंडाळा, खैरी, जुनोना, वलनी, रामपौना, ईसापुर, उमरी, बोरगांव, मांगली, मोहरी, धामणी, आसगाव गावातील वयोवृद्धांच्या थेट दारात जाऊन त्यांचे विविध योजनेचे फार्म भरून घेत त्यांना शासानाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देत आहे. प्रफुल्ल ने गरजूंना प्राधान्य देऊन गावनिहाय घरोघरी भेटी देऊन त्यांचे अर्ज भरून देण्याचे निःशुल्क समाजोपयोगी काम सुरू केले आहे.
राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य

स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वस्थ तथा योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. त्यानुरूप लाभार्थी घटकात मोडणाऱ्या वृद्धांना ऑफलाईन अर्ज भरणे, त्या विषयी माहिती लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून स्व खर्चातुन वयोवृद्धांचा फार्म भरणारा शिवनाळा येथील ध्येयवेडा युवक प्रफुल्ल ढेंगरे हा सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here