Home जालना म्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष...

म्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीच्या वतीने सत्कार

138
0

आशाताई बच्छाव

1000606348.jpg

म्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीच्या वतीने सत्कार
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख दिनांक03/08/2024
साविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड झाली.गोपाल जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे वडील प्रभाकर जाधव शेती करतात यांनी शेतीत काबाड कष्ट करून मुलाला उच्च शिक्षण द्यायचे असा त्यांचा पहिल्या पासून विचार होता. त्यांच्या या विचार सरणीतून मुलगा गोपाल यांनी सुध्दा वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व उराशी जिद्द बाळगून वडीलांचं व कुटुंबाचं स्वप्न साकार केलं . त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांच्या यशा मुळे त्यांचे जाफराबाद तालुका व म्हसरूळ परिसरातून कौतुक करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या यशाचा व जिद्दीचा गौरव म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी जालना जिल्ह्यातील समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुचना केली त्यानुसार जालना जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीच्या वतीने त्यांचा माहोरा येथे सत्कार करण्यात आला आहे.यावेळीआखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके, जिल्हा अध्यक्ष कृष्णा लहाने, जिल्हा संघटक अनिस पठाण ठेकेदार, दीव्यांग जिल्हा अध्यक्ष बबन लहाने, तालुका अध्यक्ष रामदास कदम व प्राध्यापक अर्जुन शेजुळ या सर्वांनी सत्कार करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या हातून भ्रष्ट्राचार मुक्त लोकांची सेवा घडो अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here