Home बुलढाणा देऊळघाट, धामणगाव बढे नगरपंचायत झालीच समजा! आ. गायकवाड यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याचे निर्देश

देऊळघाट, धामणगाव बढे नगरपंचायत झालीच समजा! आ. गायकवाड यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याचे निर्देश

29
0

आशाताई बच्छाव

1000603521.jpg

देऊळघाट, धामणगाव बढे नगरपंचायत झालीच समजा! आ. गायकवाड यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याचे निर्देश
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट व धामणगाव बढे या दोन ग्रामपंचायतींना येत्या सहा महिन्यात नगरपंचायत म्हणून स्थापन केले जाणार आहे. या संदर्भात आ संजय गायकवाड यांच्या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन गावांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे
आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा धडाकाच लावला आहे. विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट लोकसंख्या अंदाजे 23 हजार पेक्षा अधिक झाली आहे. तर धामणगावबढेची लोकसंख्या 11335 आहे. सद्यस्थितीत सदर ग्रामपंचायत हद्द व परिसराची मुख्य बाजारपेठ सदर दोन्ही गाव आहे. या ठिकाणी असून गावात 600 पेक्षा अधिक लहान मोठे व्यावसायिक आहेत. परंतु ग्रामपंचायत असल्याने सदर गावाचे उत्पन्न अतिरिक्त कमी आहे. सदर ग्रामपंचायत निधी अभावी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाही. तसेच सदर ग्रामपंचायत गावांच्या लोकसंख्येचा विचार करता या गावात आवश्यक त्या आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, विद्युत, क्रीडा सुविधा
पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती नवीन नगरपंचायत स्थापना झाल्यास या गावाचा गतीने विकास होऊ शकतो तसेच स्थानिक नागरिकांना आवश्यकता सुविधा सुद्धा पुरवणे शक्य होऊ शकतात. त्याकरिता सदर ग्रामपंचायती ठिकाणी नवीन नगरपंचायत स्थापन करावे अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यातच या दोन्हीही ग्रामपंचायती लवकरच नगरपंचायत म्हणून स्थापन होणार आहे.
विकासाला मिळणार गती

शहराच्या विकासाला गती मिळावी याकरिता शासनाच्या वतीने नगरपालिका मार्फत विविध योजना राबविल्या जातात ज्यामध्ये नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण रस्ते अनुदान व पर्यटन अशा अशा योजनांवर स्वतंत्रपणे कोट्यावधीचा निधी दिला जातो त्यामुळे विकासाला गती मिळते त्याच धर्तीवर आता देऊळघाट व धामणगाव बढे नगरपंचायत ला देखील निधी मिळणार आहे ज्यामुळे या दोन्ही गावाचा विकास हा झपाट्याने होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

Previous articleबँकेवाले परेशान करत आहेत, पत्नीला कॉलवरून सांगितले अन्…. बंदुकीतून गोळी डोक्यात आरपार शिरली, भिंतीला लागून खाली पडली !
Next articleसिल्लोड येथे ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजने’ चा शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here