आशाताई बच्छाव
आमदार राजेश एकडे साहेब इकडे लक्ष देता का? – निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडले
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मलकापूर :- बुलढाणा आमदार राजेश एकडे यांनी निधी उपलब्ध केला. चार महिन्या अगोदर रस्त्याचे भूमिपूजन केले केले होते. या भूमिपूजनाचा आमदारांना विसर पडला असून मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावातील रस्त्यावरून विद्यार्थी -ग्रामस्थांना चिखल तुडवीत जावे लागत आहे.
मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव म्हणजेच घिर्णी गावातील बरेचसे नागरिक शेतीचे काम करण्यास सोपे व्हावे यासाठी आपल्या शेतामध्येच राहतात आणि तिथूनच आपला उदरनिर्वाह करतात आणि आपल्या मुलांना शिकवतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी गावांमध्ये यावे लागते.
दगड गोट्यांचा खडतर प्रवास करून नागरिक गावामध्ये पोहोचतात परंतु पावसाळ्यामध्ये ही स्थिती खूप बिकट होते. शाळांमध्ये आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते. काही महिने अगोदर गावातील काही ठराविक शेतकरी व नागरिकांनी तालुक्याचे आमदार राजेश एकडे यांच्या कानावर ही बातमी टाकली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निधी उपलब्ध करून दिला परंतु गावातील पुढाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. याकडे गावातील ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.