Home रायगड कोकणात यंदा मासेमारीचा मुहूर्त पुढे ढकलला जाण्याची शक्यता

कोकणात यंदा मासेमारीचा मुहूर्त पुढे ढकलला जाण्याची शक्यता

28
0

आशाताई बच्छाव

1000597805.jpg

कोकणात यंदा मासेमारीचा मुहूर्त पुढे ढकलला जाण्याची शक्यता

 

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

खराब हवामानाचा फटका । अलिबाग कोकणात मासेमारी हंगामाला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मच्छीमार बांधवांनी समुद्रात उतरण्याची तयारी केली असली तरी १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

गेले दोन महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छीमारांनी त्यांच्या बोटी किनारपट्टीला शाकारून ठेवल्या होत्या. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामाची मच्छीमार सुरुवात
करणार आहेत. यासाठी लगबग सुरू झाली आहे. बोटीची डागडुजी आणि रंगरंगोटी आणि मच्छीमार जाळ्यांची देखभाल दुरुस्तीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. डिझेल, बर्फ अन् धान्य याची जमवाजमव सध्या सुरू आहे. किनाऱ्यावर जाळी विणणे, होडपांना तेल लावणे, बोर्ड रंगवणे यांसारखी कामे सरू आहेत.

परंतु किनारपट्टीवरील भागात सोसाटपाचे वारे वाहत आहेत. पावसाचा जोरती कायम आहे. त्यामुळे मच्छीमार समुद्रात बोटी उतरवाव्यात अथवा नाहीत, यावाचत साशंक आहेत. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी अद्याप आपल्या बोटी पाण्यात उतरवलेल्या नाहीत. त्यामुळे १ ऑगस्टचा मुहर्त टळण्याची शक्यता आहे, दरवर्षी समुद्रात भरपूर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे, अशी मनोभावे प्रार्थना करुन्, तसेच मुहूर्त काढून, पुजाअर्चा करून मासेमारी होडया समुद्रात सोडल्या जातात. काही जण नारळी पौणिमिनंतर आपल्या बोटी पाण्यात उतरवत असतात, त्यामुळे यंदा मोजक्या बोटीच १ तारखेला मागेमारीला जातील,

( किनारपट्टीवर वान्यांचा जोर अजून कमी झालेला नाही. पावसाचा जोर अद्याप ओसरला नाही. त्यामुळे बोटी समुद्रात उतरवाव्यात अथवा नाही, याबाबत आम्ही साशक आहोत. – सचिन पावशे, मच्छीमार )

रायगड जिल्ह्यात पाच हजार मासेमारी नौका असून, यात हजार ४९९ बिगर यांत्रिकी, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौकांवा समावेश आहे, जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ४० हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. यातील ३० टक्के मासे यूरोप आणि जपानसारख्या देशात निर्यात केले जातात, तर जिल्हाला २१० किमीचा समुद्रकिनारा लाभला असून समुद्र आणि खाडीलगतच्या १०३ गावांत मासेमारी व्यवसाय बालवे. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार लोक या व्यवसायाशी निगडित असून मासेमारी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते.

Previous articleपेण येथील मूक मोर्चात मागणी : यशश्री शिदेच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा
Next articleशेतकऱ्यांच्या प्रश्नावर देवळा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here