Home रायगड पेण येथील मूक मोर्चात मागणी : यशश्री शिदेच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक...

पेण येथील मूक मोर्चात मागणी : यशश्री शिदेच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा

28
0

आशाताई बच्छाव

1000597788.jpg

पेण येथील मूक मोर्चात मागणी :
यशश्री शिदेच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ:- मुजाहीद मोमीन

उरण येथील यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेण येथे आयोजित मूक मोर्चा करण्यात आली.

उरण येथील तरुणी यशश्री शिंदेची क्रूरतेने हत्या करण्यात आली, या हत्येच्या निषेधार्थ सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून पेण शहरात मुक मोर्चाची हाक देण्यात आली होती, या मुक मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे आणि विविध प्रकारच्या सामजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून मुक मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगर पालिका चौक, बाजारपेठ मार्गाने पेण पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देऊन केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी केली.

कोणतीही महिला हरवली तर चोवीस तासांच्या आत तिची तक्रार दाखल करण्यात यावी. महिलांसाठीच्या कायद्यांची कठोरपणे अम्मलबजावणी करावी, शासन आणि गृह मंत्रालयाने महिलांसाठी खास कमिटी तयार करून महीलांच्या तक्रारीचे निवारण तातडीने करावे अशी मागणीलेखी निवेदनातुन करण्यात आली.

या मूक मोर्चात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे समिर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते वैशाली पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, शमा म्हात्रे, नंदा म्हात्रे, प्रविणा सावंत, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, वाहतूक सेनेचे दिलीप पाटील, विभाग प्रमुख राजू पाटील, भगवान पाटील, गजानन मोकल, तुकाराम म्हात्रे, जयराज तांडेल, लव्हेंद्र मोकल, दिलीप बामणे, महानंदा तांडेल, वैशाली समेळ, मेघना चव्हाण वैशाली बामणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने माधव गोटमवाड सन्मानित
Next articleकोकणात यंदा मासेमारीचा मुहूर्त पुढे ढकलला जाण्याची शक्यता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here