आशाताई बच्छाव
पावसाळा तोंडावर असुनही पांदण रस्ते दूर्लक्षीतच,पाणंद रस्ते दुरुस्ती करणे धाड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चांडोळ बुलढाणा :- धाड परिसरातील अनेक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र, दुरुस्ती व देखभालीअभावी बहुतांश पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याची सुरूवात झाल्यावर ऐन खरीप हंगामात पांदण रस्त्यांची अवस्था फार बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या नक्षत्रास सुरूवात झाल्यावर ही शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठया प्रमाणात कसरत करावी लागत असल्याचे पहावयास दिसत आहे. . शेतकऱ्यांचे असे होत असल्यावर सुद्धा धाड परिसरातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता लोकप्रतिनिधी सह शासन व प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे या पांदण रस्त्याचा वनवास आता तरी संपणार का ? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करून त्यांना हैरण करून सोडताना दिसत आहे.
धाड परिसरातील अनेक पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून अकुशल माती काम झाले आहे. काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत हया पांदण रस्त्यांची पावसाळ्यामध्ये फार दयनीय अवस्था होत असते . ज्या शेतकऱ्यांना शेतात जागा आहे असे शेतकरी पावसापूर्वीच खत,बियाणे शेतात नेऊन ठेवतात परंतु ज्यांच्या कडे जागा नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रशन ही शेतकऱ्यांना भेडसावतो तसेच पावसाळयाच्या दिवसात शेतमालाची ने – आण करणे , पेरणी करण्याकरिता मजूर नेणे , बैलबंडीने किंवा ट्रॅक्टरने शेती उपयोगी अवजारे व खत किंवा तत्सम साहित्य पोहोचवणे याकरिता पावसाळ्यात पांदण रस्ता चिखलमय असल्याने शेतकऱ्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. परिसरातील शेतकरी शासन व प्रशासनाकडे वारंवार पांदण रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्ताव देत असतात. मात्र याकडे हेतुपुरस्सर सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून नेहमीच ऐकावयास मिळते . त्यामुळे ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी पांदण रस्त्याकरिता निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे , धाड परिसरातील सर्व पांदण रस्त्याचे नूतनीकरण करून पुनरूज्जीवन करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
धाड परिसरात मातोश्री पांदण योजने अंतर्गत प्रत्येक गावात पांदण रस्ते मंजुर असल्यावर सुद्धा काम काही शेत रस्ते सोडून बरेच शेरस्ते होत नसल्याचे पहाल मिळत आहे. बऱ्याच शेत रस्तांना झाडी झुडप्यांनी अतिक्रमण केले आहे. शेतऱ्यांनमध्ये नाराजीचे सुर निर्माण झाले आहे.शेत रस्ते होणे गरजेचे आहे.