आशाताई बच्छाव
पांढरदेव-एकलारा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदार देतोयमृत्यूला आमंत्रण ….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :- बुलढाणा तालुक्यातील पांढरदेव गावाला जोडणारा एकमेव एकलारा पांढरदेव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने सुरू आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनावतक्रार सुद्धा केली होती. मात्र तक्रारीला काहीही न जुमानता रस्त्यावर गिट्टी टाकून त्यावर माती मिश्रित मुरम टाकण्यात आला. परंतु गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मुरुमाचे रूपांतर चिखलात झाले आहे. पांढरदेव येथून दररोज ये जा करणारे प्रवासी, शाळेतील मुले, व्यवसाय व कामानिमित्त बाहेरगावी जाणारे नागरिक मोटारसायकल घसरून यावरून पडत आहे चाकाला चिखल लागल्याने चाक जाम झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. गावाचे तलाठी यांना मोटरसायकल उभी करून पायी प्रवास करावा लागल्याची खेदजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे मातीच्या रस्त्यापेक्षा खड्डयांचा रस्ता बरा होता अशी चर्चा होत आहे.
दररोज शेकडो वाहने ये जा करत असतांना मतिमिश्रित मुरुमामुळे जनसामान्यांचे हाल होत असून या चिखलमय रस्त्यावरून एखादी दुचाकी गाडी घसरून एखाद्या नागरिकाची जीवित्वाची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी तात्काळ माती बाजूला करून रस्ता तयार करावा अशी मागणी होत आहे.