आशाताई बच्छाव
भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.काही दिवसांपूर्वींच त्यांची मुंबई येथून बुलढाण्यात बदली झाली होती.सविस्तर वृत्त अशे की बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड होते.ते सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. दरम्यान,अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अजय गिरी यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.