आशाताई बच्छाव
खैरखेड गावांमध्ये घाणीच्या पाण्याचे साम्राज्य,गावातील रस्त्यावर झाला चिखल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सरपंच सचिव यांचे दुर्लक्ष….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा तालुक्यातील सौंयदेव, खैरखेड गट ग्रामपंचायत असलेलं खैरखेड गावात रस्ते प्रचंड खराब झाले असून, त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसत आहे. नाल्यांचे साफसफाई नाही, नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचलेले आहे रस्त्यावर सारा चिखल झाल्याने गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल संतापाची लाट उसळली आहे, खैरखेड गावातील नागरिक रस्त्यातील खड्ड्यामुळे आणि चिखल्यामुळे खूपच त्रस्त झाले आहेत गावाच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. आणि नाल्या चिखल्याने भरलेल्या आहे, नागरिकांना या समस्यामुळे दैनंदिन जीवनात खूप त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे. परिणामी रस्त्यावर असलेला पाण्यात डास अंडी घालत आहे त्यामुळे मच्छरांची संख्या ही दिवसान दिवस वाढत आहे, त्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्यस हानीकारक आहे ग्रामपंचायत ने नागरिकांच्या जीवाशी खेळुनये असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.