Home बुलढाणा वसुलीबहाद्दर एएसआय रिढे ‘अटॅच टू कंट्रोल रुम’! पोलीस अधीक्षक कडासने यांचे आदेश;...

वसुलीबहाद्दर एएसआय रिढे ‘अटॅच टू कंट्रोल रुम’! पोलीस अधीक्षक कडासने यांचे आदेश; ट्रकचा पाठलाग करणे भोवले

46
0

आशाताई बच्छाव

1000555543.jpg

वसुलीबहाद्दर एएसआय रिढे ‘अटॅच टू कंट्रोल रुम’! पोलीस अधीक्षक कडासने यांचे आदेश; ट्रकचा पाठलाग करणे भोवले
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
खामगाव : – एक पोलीस अधिकारी पैश्यासाठी आपल्या खाजगी कारने वाहनधारकांचा पाठलाग करतो. विनाकारण वाहने T अडवून कारवाईचा धाक दाखवत त्यांच्याकडे पैश्याची मागणी करत असल्याचा नागपूर- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील एक व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान या व्हिडिओची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिले डीआहेत. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले बीएएसआय सुभाष रिंढे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवून पैशासाठी त्रास दिल्या जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. दरम्यान एका ट्रक चालकाने सदर पोलीस अधिकारी ट्रकचा पाठलाग करत असताना व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये
सदर पोलिसाला ट्रक चालक हा शिवीगाळ करत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी एएसआय सुभाष रिंढे यांना तात्काळ खामगाव येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या सूचना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांना दिल्या. त्यावरून वाघ यांनी सदर कर्मचाऱ्याला १४ जुलैच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास खामगाव कंट्रोल रूमला सलग्न करण्याचे आदेश काढले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Previous articleमोडकळीस आलेल्या देगलुर येथील महावितरण कार्यालयाचे बांधकाम करा-धनाजी जोशी.
Next articleसमृद्धी महामार्गावर पडले मोठे भगदाड..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here