Home बुलढाणा वृद्धाश्रमातील वृद्ध स्वगृही सुखरूप परत..

वृद्धाश्रमातील वृद्ध स्वगृही सुखरूप परत..

34
0

आशाताई बच्छाव

1000553020.jpg

वृद्धाश्रमातील वृद्ध स्वगृही सुखरूप परत..
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :-बुलढाणा ऋणानुबंध सामाजिक संस्था संचालित तुकाराम आश्रम वृद्धाश्रम भोकर हे वयोवृद्ध लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक वृद्धांना तसेच बेवारस लोकांना आश्रय मिळालेला आहे व बऱ्याच ठिकाणी हरवलेल्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचण्याचे काम या सामाजिक संस्थेने केले आहे. त्याचाच एक प्रत्यय म्हणून दोन दिवसांपूर्वी पुंडलिक गायकवाड रा .गोदमगावं ता., बिलोली जिल्हा नांदेड वय अंदाजे 80 ते 85 यांच्या सांगण्यावरून हे छत्रपती नगर जिल्ह्यातील रांजणगाव एम. आय. डी. सि. परिसरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले होते.परंतु दोन्ही कानाने ऐकू येत नसल्याने व वयोवृद्ध असल्यामुळे ते भटकंती करीत चिखली पो‌. स्टे. च्या हद्दीतील पंचायत समिती च्या मागील बाजूस श्री कालूका माता मंदिरा जवळ आले व तेथील रहिवाशी अंभोरे बाई व पवार बाई यांना सत्य परिस्थिती सांगितली .त्यांनी त्यांना चहा पाणी करून त्या बेवारस वयोवृद्धस पो. स्टे. चिखली येथे आणले. त्यामुळे त्यांचा शोध लागेल तोपर्यंत त्यांना “तुकाराम आश्रय वृद्धाश्रम ” भोकर येथे प्रवेश देण्यात यावा. असे पत्र चिखली पोलीस स्टेशन चे तुकाराम आश्रय वृद्धाश्रमास प्राप्त झाल्याने त्या निराधार बेवारस वयो वृद्धास तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे प्रवेश देण्यात आला होता. या बाबत चिखली पो .स्टे. च्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊ त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले .यावेळी त्यांचा मुलगा अमृता पुंडलिक गायकवाड यांच्या सोबत रांजणगाव चे सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ आबखड, संजय अंभोरे व भरत कणखर हे होते. यावेळी त्यांनी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमा चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. तसेच चिखली पोलीस याचे विशेष सहकार्य मिळाल्याने त्यांचे सुद्धा आभार सदर वृद्धाचे नातेवाईक व वृद्धाश्रम चे संचालक यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here