Home अमरावती अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख;”ट्राफिक सिग्नल”केवळ पाच. वाहतुकीची वाहत आहात २५ चौकात...

अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख;”ट्राफिक सिग्नल”केवळ पाच. वाहतुकीची वाहत आहात २५ चौकात सिग्नल ची गरज.

40
0

आशाताई बच्छाव

1000548854.jpg

अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख;”ट्राफिक सिग्नल”केवळ पाच. वाहतुकीची वाहत आहात २५ चौकात सिग्नल ची गरज.
दैनिक युवा मराठा
पी एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शहर आणि विभाग स्तरावर महानगराची वाहतूक कोंडीमुळे वाट लागली आहे. महानगराची सुमारे दहा लाख लोकसंख्या असताना वाहतूक नियंत्रण करणारे केवळ पाच”ट्राफिक सिग्नल”असल्याची बाप पुढे आली आहे. त्यामुळे नव्याने २५ चौकात शिकण्याची गरज भासू लागली आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती हे प्रादेशिक जिल्हे असून, विभागाची प्रमुख शहरे मानली जातात. नागपूर शहर आणि विकासाची कात टाकली आहे. वाहतूक आणि रस्ते नियोजनात नागपूर आघाडीवर आहे. मात्र, विकासात्मक दृष्ट्या अमरावती शहर प्रचंड माघारले आहे. एक मॉडेल स्टेशन वगळता औद्योगिक, शैक्षणिक आणि दळणवळणांच्या बाबतीत अमरावतीची वाट लागली आहे. अमरावतीत विकासाच्या नियोजनाचा अभाव हे महत्त्वाचे कारण दिसून येते. शहरातील लोकसंख्या वाढल्यामुळे आयुक्तालय निर्माण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना बळ मिळाले. मात्र, येथील अंतर्गत वाहतूक ही वाहनधारकासाठी सर्कस ठरली आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शंका विदर्भात प्रथम क्रमांकाची आहे. एका प्रवाशा करता अनेक ऑटो रिक्षा उभे येऊन टेकतात. महत्वाच्या चौकात वाहतूक कोंडी ही मुक्याची बाब आहे. अमरावती शहरात पाच ट्राफिक सिग्नल फक्त सुरू आहे. शहरात किमान ४० चौक आहे. या सर्व चौकामध्ये सकाळ, सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक नियंत्रण साठी किमान २८ चौकात”ट्रॅफिक सिग्नल”आवश्यक आहे. पंचवटी चौक, ईर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल, राजकमल चौक, शेगाव नाका, या पाच ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल आहे. अमरावती महानगरात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला काही ठिकाणी नवीन ट्राफिक सिग्नल निर्माण करणे गरजेचे आहे. यात गांधी चौक, जवाहर गेट, आंबा गेट, इतवारा बाजार, नवाथे चौक, सरोजचौक, जस्तंभ चौक, गोपाल नगर डी मार्ट चौक, यशोदा नगर,,दस्तूर नगर चौक मोती नगर चौक, मध्यवर्ती बस स्थानक, अमरावती रेल्वे स्थानक चौक, कॉटन मार्केट चौक, वडाळी ऑक्सिजन पार्क, सुंदरलाल चौक, चपराशी पुरा, रहाटगाव रिंग रोड, कठोरा नाका ट्रॅव्हल पॉईंट, विदर्भ महाविद्यालय, कॅम्प चौक राजापेठ, चांदणी चौक, फरशीस्टॅप, विलासनगर, बडनेरा जुनी वस्ती तसेच अकोला यवतमाळ मार्गावर ती पहिल्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावणे काळाची गरज झाली आहे. बस स्थानक रुख्मिणी नगर जिल्हाधिकारी कार्यालय चौक राजगाव रिंग रोड आणि चौकशी पुरा चौक येथील सिग्नल बंद आहे. शहरातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी वाहतूक नियमासाठी ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यानीवंत करण्यात आली आहे. काही ठिकाणी ब्लिकर्स लावण्यात आली आहे. शाळा सहकारी ठिकाणी सिग्नल नसली तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तौनात असतात. अशी माहिती संजय आढाव पोलीस वाहतूक निरीक्षक यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here