आशाताई बच्छाव
ग्रामपंचायतीने तर हद्दच केली चक्क लहान मुलांना जावं लागतंय चिखलातून रामनगर येथील प्रकार चिमुकल्याचा सवाल स्थानिक प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरोचीफ
बुलढाणा,:-चिखली तालुक्यातील आरोग्य व शिक्षणावर जिल्हा प्रशासनाने फोकस केले असतानाही स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर मुद्द्याकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चिखलमय रस्त्यावरून दिसून येते रामनगर येथील गावातून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा चिखलमय रस्ता तुडवत चिमुकल्यांना अंगणवाडी जावे लागत आहे. ग्रामीण भागात अद्यापही फारशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे चिखली तालुक्यातील रामनगर येथील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होतो हा रहदारीचा रस्ता असल्याने येथील नागरिकाची ये जा असते या रस्त्याचे चिमुकल्या ची विद्यार्थ्यांना अंगणवाडीतच जावे लागते पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे चिमुकली मुले अंगणवाडीत जाण्यासाठी टाळाटाळ करतात मात्र शिक्षणाशिवाय तरनोपाय नसल्याने पालक वर्ग हा आपल्या पाल्याचे मन वळवी त्यांना अंगणवाडीत जाण्यासाठी प्रोत्साहित करतात चिखलातून वाट शोधत चिमुकल्या अंगणवाडी केंद्र गाठत आहेत रस्तादुरुस्तीची मागणी अनेक वेळा करण्यात आली परंतु अद्यापही नाव स्थानिक प्रशासनाने दखल घेतली न पंचायत समिती प्रशासन या रस्त्याबाबत चिमुकल्यासह पालकांना आश्वस्थ केले शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नसेल तर चिमुकल्या मुलांच्या मनावर नाकारतेचे भाव कोमटण्याची भीतीही पालकांमधून वर्तवली जात आहे ग्रामीण भागातील शिक्षणावर विशेष भर दिल्याचे सर्वश्रुत आहे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्राची रोपळे अलाटण्यावर इमारती बोलक्या करण्यावर त्याचा विशेष भर आहे याच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील पालक वर्ग ही भारावून गेला असून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहे येथे आठ दिवसात या रस्त्याची प्रश्न निकाली निघाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे
रस्त्यावरील चिखल तुडवत तारेवरची कसरत करीत मुलांना अंगणवाडी गाठावी लागते चिखलामुळे काही ठिकाणी घसरगुंडी झाल्याने पाय घसरत चिखलात पडण्याच्या घटनाही घडत आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना करावी..
विष्णू तावरे
पालक रामनगर