Home अमरावती मुख्यमंत्री लाडकी बहीण”योजनेला यशस्वी करण्याचा मविआचा डाव मोडण्याची मोहीम.

मुख्यमंत्री लाडकी बहीण”योजनेला यशस्वी करण्याचा मविआचा डाव मोडण्याची मोहीम.

41
0

आशाताई बच्छाव

1000548422.jpg

“मुख्यमंत्री लाडकी बहीण”योजनेला यशस्वी करण्याचा मविआचा डाव मोडण्याची मोहीम.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”या महत्वकांशी
योजनेचा प्रचार करून यात अडथळे आणण्याचा आणि बदनाम करण्याचा कुटील डाव महाविकास आघाडीने आखल्या चा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही यासाठी योजना आखल्याचीही त्यांचे म्हणणे आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येताच भारतीय संविधान बदलणार या महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचारानंतर आता या योजनेचा अप्रचार केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेला राज्याच्या सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राज्यभर या योजनेचे स्वागत झाले. मवीआच्या नेत्यांनी ठिकठिकाणी आपल्या लोकांकडून तसे प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीने विधिमंडळात या योजनेला कसून विरोध केला. ही योजना जाहीर केली, तेव्हा मवीआच्या नेत्यांना बराच राग आला. तिकडे विरोध करत असताना मवीआच्या नेत्यांना बराच राग आला. तिकडे विरोध करत असतानाच मवीआच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे फोटो छापून लोकांना पत्रके वाटणे सुरू केले आहे. जणू काही योजना आपणच आणली या अवीर्भावात काही कर्त्यांनी फार्म वाटप सुरू केले. मात्र, ज्या भगिनी आपले फार्म किंवा कागदपत्रे मविआच्या कार्यकर्त्याकडे देतील, त्यांचे अर्ज चुकीचे भरण्याचा कुटील डाव काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार गटाने आखला आहे. जेणेकरून असंख्य महिला लाभापासून वंचित राहतील आणि नंतर मवीआला माय युतीच्या नावे बोंम्ब ठोकतायेईल. मात्र त्यांचा हा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही. सदर योजनेचा फार्म महिलांनी यावरच भरावे. या योजनेत अर्जाची पूर्तता करण्यासाठी अतिशय सुलभ कार्यपद्धती महायुती सरकारने घोषित केली आहे. त्यामुळे कुणालाही एक रुपयाही न देता माहायुती सरकारने सुरू केलेल्या केंद्रावर किंवा या योजनेच्या मोबाईल याप वर आपला अर्ज भरावा. असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. दरम्यान महिला भगिनींनी महाविकास आघाडीच्या नादी लागून आपली नुकसान करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here