Home बुलढाणा भाजीसाठी रस्त्यावर जीवाची बाजी ! – चिखली रोडवर भाजीपाल्या विक्रेत्यांची धूम..

भाजीसाठी रस्त्यावर जीवाची बाजी ! – चिखली रोडवर भाजीपाल्या विक्रेत्यांची धूम..

33
0

आशाताई बच्छाव

1000546271.jpg

भाजीसाठी रस्त्यावर जीवाची बाजी ! – चिखली रोडवर भाजीपाल्या विक्रेत्यांची धूम..
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :– शहरातील चिखली रस्त्यावर दररोज भरणाऱ्या भाजी मंडईचा प्रश्न सुटता सुटत नाही. विक्रेते रस्ता सोडायला तयार नाहीत आणि
नागरिक रस्त्यावर खरेदी करणे थांबवत नाहीत. आणि पोलिसांची कारवाई देखील होत नाही. परिणामी येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
भाजीविक्रीचा व्यवसाय रविकांत तुपकर यांच्या ऑफिस समोरील रस्त्याने व पुढे चांडक लेआउट पर्यंत सुरू आहे. भाजी खरेदीसाठी एकच झुंबड उडते. ताजी भाजी मिळत असल्याने येथे हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू
लागली. ग्राहकांची संख्या वाढल्याने पुन्हा भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली. ही संख्या इतकी वाढली की त्यांना रस्ता अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी हळूहळू रस्त्यावर पाय पसरले. रस्त्याकडेला बसून भाजी विक्री होत असल्याने येथे नागरिक गर्दी करतात. दरम्यान रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी अपघात देखील होत आहेत. त्यामुळे भाजीसाठी लोक जीवाची बाजी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित यंत्रणा मात्र दुर्लक्षित आहे.

Previous articleहवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर !
Next articleकोमलने विहीरीत उडी मारुन संपविले जीवन; बुलढाणा शहरातील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here