Home बुलढाणा जिल्हा स्त्री रुगण्यालय अकोला येथे रक्तदाता म्हणून अमर पाटील सन्मानित…

जिल्हा स्त्री रुगण्यालय अकोला येथे रक्तदाता म्हणून अमर पाटील सन्मानित…

32
0

आशाताई बच्छाव

1000540719.jpg

जिल्हा स्त्री रुगण्यालय अकोला येथे रक्तदाता म्हणून अमर पाटील सन्मानित…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :– नांदुरा गेल्या ६ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड नांदुराच्या माध्यमातून अमर पाटील हे रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत.तसेच बाराही महिने ओळखीचे असो वा अनोळखी कोणीही फोन केला तरी रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अमर रमेश पाटील हे करत असतात.या कार्याची दखल घेत अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे दिनांक ११ जुलै २०२४ रोजी रक्तदाता म्हणून अमर पाटील यांना शासकीय रक्तपेढी अकोला कडून मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शीतल पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.सोबतच त्यांचे सहकारी कुलदीप डंबेलकर यांचा सुद्धा सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोलाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयंत पाटील साहेब,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे साहेब,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वंदना पटोकार,मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शीतल पवार,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.कुंदन चव्हाण,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.जोशी साहेब,रक्तपेढीचे कुशल तंत्रज्ञ मुशिर साहेब,डॉ.भारती पानझाडे मॅडम उपस्थित होते.

Previous articleप्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास …
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रामुळे वाशिम ते पंढरपूर बसेस विठ्ठल दर्शनाकरिता वाशिम मधून बसेस रवाना ____
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here