Home बुलढाणा वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र झाले शुभेची वस्तू ,दवाखान्यात फक्त एक नर्स,...

वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र झाले शुभेची वस्तू ,दवाखान्यात फक्त एक नर्स, बाकी आपापल्या घरी,जिल्हा आरोग्य अधिकारी हाकलतो उंटावरून शेळ्या….

33
0

आशाताई बच्छाव

1000540715.jpg

वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र झाले शुभेची वस्तू ,दवाखान्यात फक्त एक नर्स, बाकी आपापल्या घरी,जिल्हा आरोग्य अधिकारी हाकलतो उंटावरून शेळ्या….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी घरूनच आपला कारभार सांभाळत असल्याने १३ खेड्यांना वाऱ्यावर सोडले आहे.रुग्णालयात दहा वाजता पासून येण्यास सुरुवात होते आणि एक वाजता पासून कर्मचारी घरी जाण्यास सुरुवात होते. कोटी रुपये खर्च करून निवास स्थान बांधण्यात आले त्या मध्ये राहायला अधिकारी,कर्मचारी नाही,पण खाली पडलेल्या खोल्यांमध्ये रोड मजूर कामगार राहतात या परिसरात दारु पिऊन कर्मचारी निवासस्थानात बाहेरील लोक येऊन पार्ट्या करतात.
इतर निवासस्थाने ओस पडली आहे. रुग्णालयात सी.सी. टिव्ही कधी चालू तर कधी बंद,थम मशीन लावली तिलाही निकामी केली.यातच येथील कर्मचाऱ्यांची मिली भगत असल्याने एकमेका सहाय्य करू एकाला पाठऊ त्याचा फोन आला की मी गावात गेलो, पेशंट ला पाहण्या करिता, दुसरा कारण सांगतो जेवायला तिसरा सांगतो चहा घ्यायला चौथा सांगतो लसीकरणाला एक मेकांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जातो आणि तो यशस्वी होतो,अनेक कर्मचारी गैर हजर असताना आज पर्यंत अनेक तक्रारी झाल्या एकाही कर्माच्यऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणतात पथक नेमु व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सात महिन्यापासून गावकरी पथकाच्या शोधात आहे.सात महिन्यात दोन सिओच्या बदल्या झाल्या, सिओनी चार्ज घेतल्यानंतर जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य सेवेवर भर देऊन अशी आश्वासने जिल्ह्यातील नागरिकांना देतात पण कोणतीच आश्वासने आतापर्यंत पूर्ण करताना बुलढाणा जिल्ह्याला दिसलेले नाही.
यांच्या मनमानी कारभारांमुळे रुग्णाचे हाल होत आहे.मनमानी कारभाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य केंद्र असतानाही कुणालाच वेळेवर सुविधा मिळत नाही किंबहुना आरोग्य विभागाला सर्व सामान्यांच्या आरोग्याची जान कधी होईल असा सवाल करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी हे नावापुरते झाले आहे फोन केला तर उचलत नाही उचलला तर तालुका अधिकारी यांचे शी बोलण्याचा सल्ला देऊन फोन बंद करतात आणि तालुका आरोग्य अधिकारी दखल घेत नाही एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था वरवंड येथील आरोग्य विभागाची झाली आहे.
आता नवीन सिओनी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना शिक्षण व आरोग्य सेवेवर भर देऊन काम करु अशी माहिती नागरिकांना दिली आवाहन सुद्धा केले.त्यांच्याकडे वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे ते या तक्रारीवर काय कारवाई करतात याकडे वरवंड परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleउपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर निमगांव वायाळ येथील रेती साठ्याची लावली नायब तहसिलदार यांनी वाट,
Next articleप्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here