Home बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर निमगांव वायाळ येथील रेती साठ्याची लावली नायब तहसिलदार...

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर निमगांव वायाळ येथील रेती साठ्याची लावली नायब तहसिलदार यांनी वाट,

37
0

आशाताई बच्छाव

1000540707.jpg

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर निमगांव वायाळ येथील रेती साठ्याची लावली नायब तहसिलदार यांनी वाट, उपविभागीय अधिकार्यांच्या आदेशाला खालच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली होती केराची टोपली, रेती साठे कमी दाखविण्या मागचा मुख्य सुत्रधार कोण?
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
सिंदखेड राजा :-बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या रेती विषय उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये निमगांव वायाळ येथील रेती साठ्यावर धडक कारवाई निवासी नायब तहसिलदार डॉ अस्मा मुजावर यांनी कारवाई केली.नंतर त्यांनी मंडळाधिकारी व तलाठी यांना बोलावून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण मंडळाधिकारी व त्यातील तलाठी यांनी रेतीचा स्टॉक जास्त असूनही पंचनामा मध्ये कमी दाखवले.व तसेच अनेक ठिकानाची रेती साठे न पाहता सोडून दिले तर या जप्त रेती साठ्याचे पंचनामे सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत मोजण्याची गावकर्यांची मागणी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगांव वायाळ येथून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उखनन सुरु असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मौजे निमगांव वायाळ येथे बैठे पथकाची नियुक्ती 5 जुलै रोजी केली होती यानुसार दिनांक 5 जुलै रोजी शुक्रवार रात्री पथकातील कर्मचारी तलाठी श्रीमंत पांडव व कोतवाल डी एच ढाकणे यांनी त्या दिवसी रात्रभर जागून एकही रेतीचा खडा तस्कुराला काढू दिला नाही. तर दिनांक 6 जुलै रोजी शनिवारी पथकातील कर्मचारी जी. वाय. दराडे व कोतवाल आकाश मघाडे व 7 जुलै रोजी रविवार पथकातील कर्मचारी तलाठी आर बी
काकडे व कोतवाल एस बी किगरे हे घटनास्थळावर उपलब्य नसल्याने रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करून गावातील परीसरात मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला होता सदर साठ्याची माहीती उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांना माहीती होताच त्यांनी स्वतह देउळगांव राजा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदार केद्राला भेट देत असताना त्यांनी तात्काळ नायब तहसिलदार डॉ अस्मा मुंजावर यांना निमगांव वायाळ येथील रेतीचे साठे जप्त करण्यासाठी पाथविले असता नायब तहसिलदार यांनी सदर ठिकानी पाहणी केली असता अनेक ठिकाणी त्यांना रेती चे साठे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सदरील मंडळाधिकारी व तलाठी यांना बोलावून पंचनामे करण्याचे आदेश दिले . पण मंडळाधिकारी व तलाठी यांनी काही ठिकाणचे रेतीचे स्टॉक न पाहताच सोडून दिले आहे तर अनेक साठ्याचा पंचनामा अत्यंत कमी केला असल्याने गावकर्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. सदर रेती साठ्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याची मागणी होत असून या साठाचा जाहीर लिलाव करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे निवासी नायब तहसिलदार अस्मा मुजावर यांनी निमगांव वायाळ येथे प्रवेश करताच 133 ब्रास रेतीचा साठा पकडल्याची माहिती मंडळ अधिकारी दुसरबीड तलाठी जऊळका, विझोरा, कोतवाल सुलजगाव यांनी दिली. वास्तविक पाहता सदरील रेतीचे ढीग पाहता हे हजार ते बाराशे ब्रास आहे. पण या पंचनाम्यात हे रेती साठे जुन मध्ये रेती उत्खनन दिखविले आहे तर पंचनाम्यासाठी बोलविलेले पंच यांची आणि रेती तस्कर यांचे आर्थिक संबंध आहे. सदर रेती साठ्याची मोजमाप हे सार्वजनीक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे व हे मोजमाप होत नाही तो पर्यन्त या रेती साठ्याचा लिलाव करू नये अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे आहे.
मौजे डिग्रस येथील अवैध रेती साठा गेला चोरील

मौजे डिग्रस येथे नदीकाठी अवैध रेती साठा आहे अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे तलाठी व मंडळाधिकारी यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी 50 ब्रास रेती साठा असल्या बाबतचा रिपोर्ट सादर केला. त्यामुळे सर्व रेती घरकुल चा लाभार्थ्यांना तलाठी व ग्रामसेवक यांच्या समक्ष वाटप करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु त्या ठिकाणी स्थानिक नागरिक व रेती माफीयांनी वाद निर्माण केल्यामुळे केवळ वीस ब्रास च रेती घरकुल लाभार्थ्यांना देता आली. उर्वरित रेती दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरले. त्यामुळे त्या ठिकाणी रात्री पोलीस बंदोबस्त व स्थानिक तलाठी यांना थांबवले होते. परंतु पहाटे- पहाटे त्यामधील उर्वरित 30 ब्रास रेती चोरीला गेली, असा रिपोर्ट तलाठी व ग्रामसेवक यांनी सादर केला. त्यामुळे तलाठी यांच्यामार्फत किनगाव राजा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here