Home अमरावती अमरावतीतील ३०० महिला चालविणारा गुलाबी ई जिल्ह्यातील दहा हजार महिलांना लाभ.

अमरावतीतील ३०० महिला चालविणारा गुलाबी ई जिल्ह्यातील दहा हजार महिलांना लाभ.

40
0

आशाताई बच्छाव

1000540662.jpg

अमरावतीतील ३०० महिला चालविणारा गुलाबी ई जिल्ह्यातील दहा हजार महिलांना लाभ.
दैनिक युवा मराठा
पी .एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्य शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील १७ जिल्ह्यातील १० हजार महिलांना ईपईंक रिक्षा जाणार आहेत. त्यात अमरावतीचाही समावेश आहे.१०हजार ई पिंकरीक्षापैकी३०० लाभार्थी अमरावती जिल्ह्यातील निवडले जाणार आहेत. याबाबत आदेश शासनाने जारी केला आहे.ईपिंक रिक्षासाठी १० टक्के रक्कम ही लाभार्थी महिला व मुलींना उचलावी लागेल. नागरी सहकारी बँक, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँक कडून ईपिंकरिक्षाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलणार तर कर्जाची परतफेड ही पुढील पाच वर्षात करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची आहे. महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा लोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावतीसह निवडक १७ शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इच्छुक महिला ही पिंक रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी, बँक खाते पासबुक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना रिक्षा ही लाभार्थी महिलांचा चालविणार असल्याचे हमीपत्र अर्जदाराचे वय १८ते३५ वर्षा दरम्यान असणे अनिवार्य आहे. सदर समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेले आहे. यामध्ये समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. तर सदस्य म्हणून परिवहन अधिकारी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा समन्वयक, नागरी बाल बालक विकास प्रकल्प अधिकारी व सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी राहणार आहेत. ही पिंक रिक्षा लाभार्थी मायले कडूनच चालविली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहणार आहे. ही पिन रिक्षापुरुष चालविताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात तरतूद केली आहे.

Previous articleशहरातील १०४ कोटींच्या विकासकामात अधिकारी, लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार !
Next articleलाडकी बहीण योजनेचे अर्ज !मिशन मोडवर. महानगरपालिका आयुक्त: झोन न्याय अधिकाऱ्यांना आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here