Home बुलढाणा अंढेरा पोलीस स्टेशन येथुन एम.पी.डी.ए.गुन्हयातील पळुन गेलेला आरोपी जालना शहरात घेतला ताब्यात...

अंढेरा पोलीस स्टेशन येथुन एम.पी.डी.ए.गुन्हयातील पळुन गेलेला आरोपी जालना शहरात घेतला ताब्यात व येरवडा कारागृहात रवानगी गुन्हे शाखा जालना, व बुलढाणा पोलीसांची संयुक्त कारवाई …

68
0

आशाताई बच्छाव

1000532163.jpg

अंढेरा पोलीस स्टेशन येथुन एम.पी.डी.ए.गुन्हयातील पळुन गेलेला आरोपी जालना शहरात घेतला ताब्यात व येरवडा कारागृहात रवानगी गुन्हे शाखा जालना, व बुलढाणा पोलीसांची संयुक्त कारवाई …
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ
देऊळगाव राजा :– बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीची रेती ची वाहतूक वाळू माफिया कोणालाही न जुमानता करीत होते याबाबत पोलीस प्रशासन ,महसूल प्रशासन यांनी अनेक वेळा कार्यवाही केली परंतु मुजोर माफियांनी आधिकारी कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून मोठी दशहत निर्माण केली आहे त्यामुळे या वाळू माफियांच्या नांग्या ठेचण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेऊन अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाळू माफिया मनोज उर्फ मनेश उर्फ मुन्ना वाघ रा डीग्रस तालुका देऊळगाव राजा यास एम पी डी ए अन्वय प्रमाणे एक वर्षा करीता अकोला जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते त्यानंतरअनेकांवर वाळू चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने अनेक जण गाव सोडून फरार आणि न्यायालयात धाव घेत त्याच धावपळीत अंढेरा पोलिसांनी पाळत ठेऊन दुसरा वाळू माफिया माऊली वाघ रा डीग्रस या वाळू माफियाच्या मुसक्या आवळत अटक केली होती परंतु या आरोपीने पोलिसांना चकमा देत फरार झाला होता त्यामुळे ठाणेदार विकास पाटील यांनी आपली गुपित सूत्रे फिरवीत फरार वाळू माफियाच्या जालना व बुलढाणा पोलिसांनी जालना येथे मुसक्या आवळून त्याला जालना येथे अटक करून त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे त्यानुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बसंल जालना यांनी खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी आरोपी ज्ञानेश्वर दिनकर वाघ, वय-39 वर्ष, रा. दिग्रस बुद्रुक, ता. देऊळगांव राजा. जि. बुलढाणा याचा जालना शहरामध्ये शोध घेत असतांना तो निरामय हॉस्पीटल, जालना येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याठिकाणी गेलो असता त्याठिकाणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शेळके व त्यांचे सहकारी सिंदखेडराजा व अंढेरा पोलीस स्टेशनचे सोनकांबळे व उगले सह शोध पथक जालना या ठिकाणी जाऊन पळून गेलेल्या आरोपीच्या शोधात जालना येथे जाऊन त्यांनी आरोपी शोध बाबत जालना येथे मदत मागितल्याने स्थानिक गुन्हे शाखा, जालना व तालुका पोलीस ठाणे जालना यांनी संयुक्त शोध मोहिम राबवून तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी हा जिंदल कॉम्प्लेक्समध्येच लपुन बसला असल्याचे दिसुन आल्याने त्याचा जिंदल कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्याच्या मुसक्या आवळून त्यास ताब्यात घेवुन अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बसंल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना चे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, जालना तालुका पोलीस ठाण्याचे उनवणे, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सतिष श्रीवास सर्व स्था.गु.शा. जालना यांनी व सिंदखेडराजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके व सहकारी वअंढेरा पोलीस स्टेशनचे पो हे का कैलास उगले.सिद्धार्थ सोनकांबळे आदींनी कार्यवाही केली.व त्याच्या मुसक्या आवळून देऊळगाव राजा च्या डी वाय एस पी मनीषा कदम व अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आल्या नंतर त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here