Home बुलढाणा मेरा बु ते मेरा खुर्द रस्ता देत आहे मरणाला आमंत्रण वाहनधारकांना जिवंतपणीच...

मेरा बु ते मेरा खुर्द रस्ता देत आहे मरणाला आमंत्रण वाहनधारकांना जिवंतपणीच मरण यातना!

33
0

आशाताई बच्छाव

1000531619.jpg

मेरा बु ते मेरा खुर्द रस्ता देत आहे मरणाला आमंत्रण वाहनधारकांना जिवंतपणीच मरण यातना!
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- चिखली तालुक्यातील मौजे मेरा बुद्रुक रजिकय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव या गावची लोकसंख्या पंधरा ते वीस हजार चिखली तालुक्याचे सर्व सूत्र शक्यतो मेरा बुद्रुक या गावातून चालतात या गावांमध्ये राजकीय पुढारी यांचे सुद्धा कमी नाही परंतु मेरा बुद्रुक ते मेरा खुर्द तसेच मेरा गावातील रस्ता अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या राजकीय नेत्याचे या बाबीकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था अवस्था झाली आहे .
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक ते मेरा खुर्द या ६ किलोमीटर रोडचे अतोनात हाल झाले असून,हा रस्ता वाहन धारकाच्या जीवावर उठला आहे, यापूर्वी या रस्त्यावर चार जणांचे जीव सुद्धा गेलेले आहे तर अनेक वाहनधारकांना कायमचे अपंग आले असून काही दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे. या रस्त्यावरून वाहने नेने म्हणजे तारेवरची कसरतच वाहनधारकांना करावी लागत आहे.हा रस्ता जागोजागी उखडला तरी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाला लोकांचा मृत्यू झाला काय व लोकांचे मनके तुटत असले तरी काही सोयर सुतक दिसून येत नाही मेरा बुद्रुक हे गाव 15 खेड्याला संवलगण आहे त्यामुळे मेरा बुद्रुक येथे शनिवारी बाजार भरत असल्यामुळे मेरा बुद्रुक परिसरातील ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात परंतु या रस्त्याच्या अवस्थेमुळे त्यांना आपलं जीव मुठीत धरून मेरा बुद्रुक येथे येवे लागत आहे . अंत्रीखेडेकर मेरा चंदनपूर काठोडा मनुबाई,गुंजाळा, मेरा बुद्रुक येथील ग्रामस्थांना चिखली,बुलढाणा जाण्यासाठी हाच रस्ता आहे.त्यामुळे महसूल,शिक्षण,दवाखाना, खरेदीसाठी इतरि महत्त्वाच्या कामासाठी चिखली येथे जाण्यासाठी हाच रस्ता असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ,रस्ता पूर्णपणे ऊखडला असून,मेरा बुद्रुक ते मेरा खुर्द या रस्त्यावर काही ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून अनेक ठिकाणी रस्त्याची चाळन झाली आहे. मेरा बुद्रुक फाट्यापासून अंत्री खेडेकर चौदाशे मीटर चे काम एक कोटी वीस लाखांमध्ये शासकीय ठेकेदार नाथा दराडे यांना दिले आहे परंतु ठेकेदार यांनी या रोडवर कोणत्याही प्रकारचा साईड पट्या किंवा काम पूर्ण केलेले नाही सदर कामावर शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अर्धवट काम करून ठेकेदार हा फरार झालेला आहे याबाबत सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक उपविभाग देळगाव राजा यांच्याकडे केले आहेत तक्रार करून सुद्धा संबंधित विभागाने या तक्रारीकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे काम सदर ठेकेदाराने अर्धवट करून आपला भाड बिस्तरा गुंडाळून घेऊन गेले आहे ज्या रोडचे काम झाले आहे त्यांनी सुद्धा प्रवाशांना आपला जीव मोठे धरून प्रवास करावा लागत आहे वेळीच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याबाबत आवाज उठवला
हाल सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार ह्या रस्त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मेरा बुद्रुक ते मेरा खुर्द रस्ता वेळीच न झाल्यास येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता मतदान रुपी लोकप्रतिनिधींना धडा शिकवेल.
मेरा बुद्रुक गाव ते मेरा खुर्द रस्ता हा सर्व वाहनधारकांच्या जीवावर उठला असून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष न घातल्यास, मेरा बुद्रुक सह परिसरातील नागरिकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा लागेल प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here