Home भंडारा अखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गति अवरोधक लागलेच.! नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल

अखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गति अवरोधक लागलेच.! नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल

42
0

आशाताई बच्छाव

1000529366.jpg

..अखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गति अवरोधक लागलेच.!

नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली येथील स्थानिक गणेश वार्ड येथील सर्वाधिक पुरातन शाळा. ही शाळा रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांचे अवागमन सुरू असते. त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसमोर गतिरोधकाची मागणी केली होती. अखेर नगरपरिषद प्रशासनाने शाळेची दखल घेऊन सोमवार ०८ जुलैला शाळेसमोर गतिरोधक बसवून दिले.
सविस्तर वृत्त असे की, गणेश वार्ड येथील ‘माझी जनपद शाळा’ विद्यमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा क्र १. अवघ्या ४ ते ५ वर्षात शाळेतील शिक्षक वृंदाच्या वतीने शाळेने फिनिक्स भरारी घेतली. त्यामुळे कधीकाळी ८० च्या वर असणारी विद्यार्थ्यांची संख्या आगामी काळात ३०० कडे वाटचाल करू लागली आहे. ही शाळा मुख्य रस्त्यावर आहे. सदर शाळेसमोरील रस्ता हा सरळ राष्ट्रीय महामार्गाकडे जातो. दुसरीकडे शाळा परिसरात व्यापारी दुकानांची मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अशातच काही रोड रोमियो आणि सडकछाप मजनू स्वतःला “धूम” रितीक रोशन समजून वेगाने दुचाकी चालवित होते. रस्त्यावर विद्यार्थ्यांचे अवागमन सतत सुरू असल्याने वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने गतिरोधक लावण्याचा निर्णय घेऊन नगरपरिषद प्रशासनाकडे गतिरोधकाची मागणी केली. सोमवार पर्यंत गतिरोधक लावून देण्याची आगामी विनंती सूचनासुद्धा नगरपरिषदकडे करण्यात आली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला. अखेर शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रसिद्धी माध्यमाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारला हे गतिरोधक नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, बांधकाम अभियंता शुभम द्रुगकर यांच्या निदर्शनाने प्रशासनाकडून बसविण्यात आले. यात शाळेतील विद्यार्थ्यांना स्पिड ब्रेकर लागल्यामुळे त्यांना हे पाहण्यासाठी आनंद झाला होता हे विशेष.

_______________________

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया :
“त्या दिवशी दूसरीतले दोन मुले शाळेतून निघतांना थोडक्यात सुसाट मोटरसायकलने बचावले होते. आमच्या शाळेजवळ स्पिड ब्रेकर पाहिजे होते. ते लाऊन मुलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन सदस्य व नगरपरिषदेचे आभार मानतो”
— जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र १ येथील ६ वी ७ वीच्या विद्यार्थीनी.

पालक प्रतिक्रिया :
“या रोडवरून काही चारचाकी व दुचाकी वाहन अगदी सुसाट वेगाने पळवित होते. पण अश्यांना येथे लहान मुलांची शाळा आहे याचे भान नव्हते. आम्ही शाळा व्यवस्थापन समिती व नगरपरिषदेचे आभार व्यक्त करतो”
— सचिन घोनमोडे
“पालकवर्ग”
तलाव वार्ड क्र. १० साकोली

Previous articleदलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड
Next articleभिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ जालन्यातील कवी भानुदास शेवाळे यांचं काव्य सादर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here