Home भंडारा दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड

दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड

51
0

आशाताई बच्छाव

1000529364.jpg

दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड

दलाई लामा यांचा 89 वा वाढदिवस
भारत तिबेट मैत्री संघ भंडारा यांच्यावतीने केला साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)केवळ तिबेट मुक्ती हेच दलाई लामा यांचे ध्येय नाही तर मानवी मूल्यांच्या संरक्षण व संवर्धना बरोबरच संपूर्ण विश्वात अहिंसा ,शांतता व सद्भावपुर्ण वातावरणाची निर्मिती करणे हे त्यांचे स्वप्न आहे भारतीय संस्कृतीची विशेषत: समृद्ध नालंदा संस्कृती व परंपरेचा ते जगभर प्रचार व प्रसार भारताला विश्वगुरू करण्याच्या दिशेने ते प्रयत्नशील आहेत .दलाई लामा यांच्या व्यक्तित्व ,कर्तृत्व व कृतीत्वाने पंचशील नेहमी प्रकाशित ,प्रचारीत व प्रसारित होत असल्यामुळे दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती आहेत ” असे मौलिक विचार भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य अध्यक्ष अमृत बन्सोड यांनी प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले.
ते भारत तिबेट मैत्री संघ भंडाऱ्याच्या वतीने आयोजित दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त वैशाली नगर येथील सत धम्म विहाराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मन्साराम दहिवले उपस्थित होते .याप्रसंगी न.प. चे माजी उपाध्यक्ष आशु गोंडान्ने, मैत्री संघ राज्याचे महासचिव सचिन रामटेके, सामाजिक कार्यकर्ते महादेव मेश्राम, मैत्री संघ नागपूरच्या सचिव हर्षा पाटील, इंजि
रूपचंद रामटेके ,यांनी दलाई लामा यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकतानाच तिबेटच्या समस्येच्या समाधानाकरिता त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो म्हणून सदिच्छा प्रधान केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून ‘दलाई लामा अमर रहे ‘घ्या सामूहिक घोषणाही देण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी नोरगॅलिंग तिबेटन सेटलमेंट गोठणगाव येथे आयोजित सुंदर कार्यक्रमात केक कापून दलाई लामांचा जन्मदिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन भारत तिबेट मैत्री संघ भंडाराचे सचिव मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक अध्यक्ष गुलशन गजभिये यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रोशन जांभुळकर, रमेश जांगळे, राजकुमार बन्सोड , प्रशांत सूर्यवंशी, अहुजा डोंगरे , असित बागडे, अरविंद काणेकर, नागपूर मैत्री संघाचे अध्यक्ष अशोक धमगाये, राजेश हाडगे, सौ.हाडगे, टेंभुर्णीकर, प्रिया शहारे ,अनमोल देशपांडे, डी.सी. मेश्राम, पुष्पा रंगारी ,रमा गजभिये, हेमराज रंगारी ,देवराम मेश्राम, वाल्मीक डोंगरे, पी.जी.गवळीकर शुक्रध्वज घरडे, चंद्रिकापुरे ,सचिन गभणे, प्रशांत मेश्राम, रुकमांगन गोंधळे, नितेश शहारे, महेश मडके ,शुभम नगराळे, निलेश लोणारे, भास्कर सुखदेव ,अजय तांबे, इत्यादींची विशेष उपस्थिती होती.

Previous articleमद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली; एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Next articleअखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गति अवरोधक लागलेच.! नगरपरिषद प्रशासनाने घेतली शाळेची दखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here