Home रायगड बँक ऑफ इंडिया च्या थकीत कर्जदारांना कर्ज मुक्त होण्याची मोठी सुवर्ण संधी;...

बँक ऑफ इंडिया च्या थकीत कर्जदारांना कर्ज मुक्त होण्याची मोठी सुवर्ण संधी; ‘या’ दिवशी शाखांमधून साजरा होणार समझोता दिवस

84
0

आशाताई बच्छाव

1000529066.jpg

बँक ऑफ इंडिया च्या थकीत कर्जदारांना कर्ज मुक्त होण्याची मोठी सुवर्ण संधी; ‘या’ दिवशी शाखांमधून साजरा होणार समझोता दिवस

युवा मराठा न्यूज रायगड प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

देशभरातील बँक ऑफ इंडिया शाखेंच्या वतीने गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी देशभरातील तिच्या सर्व शाखा/झोन आणि FGMO मध्ये वन टाइम सेटलमेंट (OTS) अंतर्गत कर्जदारांच्या NPA कर्ज खात्यांची पुर्तता करण्यासाठी समझौता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

समझौता दिवस विशेषतः अशा NPA कर्जदारांसाठी तयार करण्यात आला आहे. की ज्या कर्जदाराच्या व्यवसायातील/ वैद्यकीय स्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत.

बँकेकडे लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटलमेंट करण्यासाठी विशेष OTS योजना आहेत ज्याद्वारे ज्या कर्जदारांची खाती NPA आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात.

या करिता बँक ऑफ इंडिया तर्फे सर्व कर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांची खाती थकीत (NPA) आहेत त्यांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी थकीत (NPA) खाती NPA कर्ज खाती तडजोड करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देशभरातील बँक ऑफ इंडीया शाखाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

यासाठी रायगड जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या थकीत

कर्जदरांसाठी बँकेच्या वतिने एक सुवर्ण संधी मिळत असून वरील

सर्व धारकांनी बँक कामकाजाच्या वेळेत गुरूवारी 11 जुलै रोजी

आपल्या नजीकच्या शाखेतील सबंधित शाखाधिकारी (मॅनेजर)

यांना भेटून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक ऑफ

इंडिया शाखांच्या वतीने तसेच मुकेश कुमार विभागीय प्रबंधक,

रायगड विभाग यांनी थकीत कर्ज धारकांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here