Home पुणे पिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार व प्रशासक कंत्राटी टक्केवारीत गुंग

पिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार व प्रशासक कंत्राटी टक्केवारीत गुंग

143
0

आशाताई बच्छाव

1000497123.jpg

पिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार व प्रशासक कंत्राटी टक्केवारीत गुंग
संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा सौ प्रफुल्ला शैलेन्द्र मोतलिंग यांनी व्यक्त केले
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
पिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार, खाजदर व प्रशासक कंत्राटी टक्केवारीत गुंग
नैसर्गिक ओढे नाले, जलप्रवाह मुजऊन बिल्डरच्या घशात घालून असुरी विकास केल्याचा परिणाम म्हणून काल झालेल्या पावसात रोडवर गटार गंगा वाहत होती याला सर्वस्वी पिंपरी-चिंचवड महानगर पालिका प्रशासन व राज्यकर्ते जबाबदार आहेत. हे जर असंच चालू राहिलं तर मुंबईला तुंबई म्हणणारे पुणेकर पुण्याची ही तुंबई होताना हातावर हात ठेवून पुण्याची जनता बघणार का?
प्रशासनाने घरोघरी कचरा जमा करण्यासाठी व रस्ते सफाईसाठी करोडो रुपयाचे कंत्राट खाजगी संस्थेस देऊनही आजची परिस्थिती नाले व रस्त्यांवर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. यावर प्रशासनाचे व स्थानिक आमदार खासदारांचे काय नियंत्रण आहे का? की फक्त टक्केवारीत ते आनंदी आहेत का?
सिमेंटचे जंगल उभे करून कोणता व कोणाचा विकास करत आहेत हे सुजाण जनतेला माहित आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून आपापली घरे भरण्याचा सपाटा चालू आहे याला विकासाचे गोंडस नाव देऊन जनतेची दिशाभूल करणे चालू आहे. पण नैसर्गिक आपत्ती मुळे सर्व सामान्य जनतेचे जीव जात आहेत. याच्याकडे प्रशासक व राज्य करते गंभीरतेने कधी पाहणार व काय तोडगा काढणार अशे प्रखड मत अंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदुत संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा मा सौ प्रफुल्ला शैलेन्द्र मोतलिंग यांनी व्यक्त केले

Previous articleमतदार यादी मध्ये नावे नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष मोहीम  –  शेख महेमूद
Next articleकांगोणी फाट्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको ब-हाणपूर येथील कुक्कुटपालन उद्योगावर कारवाईची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here