Home बुलढाणा मलकापूर शहरात रहदारीचे तीन तेरा नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते जीव मुठीत घेऊन

मलकापूर शहरात रहदारीचे तीन तेरा नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते जीव मुठीत घेऊन

32
0

आशाताई बच्छाव

1000476226.jpg

मलकापूर शहरात रहदारीचे तीन तेरा

नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते जीव मुठीत घेऊन

मलकापूर:- युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरात रहदारीचे तीन तेरा वाजले असून त्यामुळे पादचाऱ्यांना चालावे तरी कुठून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलकापूर शहरात कुठल्याही रस्त्यावरून गेले तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. पादचारी रस्त्यावरून चालायला जागाच नसल्याने नागरिकांना आपल्या सामानाच्या पिशव्या घेऊन मुख्य रस्त्यावरून मार्ग काढत तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बरोबरच, लहान मुले, वृद्ध व अपंग व्यक्ती यांचे मोठे हाल होत आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर पाई चालणाऱ्या लोकांनासाठी सोडलेल्या जागेवर रेगडी वाले छोटे दुकानदार यांनी केलेले अतिक्रमण व दुचाकीनी केलेली पार्किंग तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत आणुन ठेवलेल्या टपऱ्या यामुळे नागरिकांना पायी चालण्यासाठी जागाच शिल्‌लक राहिलेली नाही. काही ठिकाणी खाद्य पदार्थींच्या दुकानासमोर रस्त्यापर्यंत झालेली वाहनांची पार्किंग त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना मुख्य
रस्त्यांवरून आपली रहदारी करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी होऊन दुचाकी व चार चाकी वाहनांना रहदारीसाठी मोठी समस्या निर्माण होते. त्यातूनच किरकोळ व मोठे अपघात होत असतात. या प्रकाराकडे मात्र पीडब्ल्यूडी व नगरपालिका दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या सोयीसाठी सोडलेल्या पादचारी रस्त्यांसाठीची उपाय योजना करीत नाही. या समस्येकडे लक्ष न देता नगर पालिका व्यवसायिकां कडून बैठक मात्र हक्काने वसूल करते. त्यामुळे होणाऱ्या अपघातास अतिक्रमित दुकानदार जबाबदार की नगरपालिका हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन पादचारी रस्ता सूर नागरिकांमधून
मोकळा करून रहदारीस मदत करावी असा
ऐकण्यास मिळत आहे. दुकानदारांनी आपली दुकाने थेट मुख्य रस्त्यांपर्यंत आणून ठेवली आहे. तर काही ठिकाणी थेटर स्त्यां पर्यंत दू पार्किंग झालेल्या दिसतात. यात महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असते. एवढेच नव्हे तर सायंकाळी बाहेरगावी जाणाऱ्या लक्झरी गाड्‌या रस्त्याच्या बाजूला उभ्या न राहता मुख्य रस्त्यांवर उभ्या राहिलेल्या दिसतात. त्यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचारी रस्त्यांवर जागा नसते आणि मुख्य रस्त्यावर गर्दी होते त्यामुळे अनेक वेळा ट्राफिक जाम होऊन मोठी वाहने पुढे सरकत नाही व त्याचा नाहक त्रास नागरिक व अबाल वृद्धांना सहन

करावा लागत आहे. याच कारणांमुळे मागील काही काळात मलकापूर बुलडाणा रोडवर अनेक अपघात आपणास पाहण्यास मिळाले आहेत त्यात अनेक लोकांचा जीव सुद्धा गेलेला आहे. या घटनांचा विचार करता पीडब्ल्यूडी नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन याकडे जातीने लक्ष देईल का याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. छोटे दुकानदार रेगडी वाले यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करून आपली दुकाने पादचारी रस्ता सोडून लावणे गरजेचे आहे तसेच सजग नागरिक म्हणून नागरिकांनी सुद्धा आपल्या दुचाकी किंवा चार चाकी यांना पादचारी रस्त्यावर न लावता योग्य त्या ठिकाणी पार्किंग करणे गरजेचे आहे. ज्यामुळे नागरिकांना ग्रहदारीची सुविधा होऊन अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा सुजाण नागरिकांनी व व्यवसायिकांनी पादचारी रस्ता नागरिकांसाठी मोकळा कसा राहील याकडे गांभीर्याने पाहत रहदारी सुरळीत होऊन अपघात टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

Previous articleबीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी झाले निगरगट्ट!
Next article‘त्या’ प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here