Home बुलढाणा शेतकरी बांधवांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका कृषी अधिकारी यांचे...

शेतकरी बांधवांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका कृषी अधिकारी यांचे आव्हान, जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन

59
0

आशाताई बच्छाव

1000466465.jpg

शेतकरी बांधवांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका कृषी अधिकारी यांचे आव्हान, जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे लवकरच पेरणी सुरू करण्याच्या तयारीत आहे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधिकारी ढगे साहेब यांनी केले आहे.आपल्या प्रत्येक भागात 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये सध्या जिल्ह्यात जूनच्या सरासरीत 50 टक्के पाऊस झालेला आहे. 100 मिलिमीटर पाऊस झाल्यास जमिनीमध्ये ओलावा तयार होणार ज्यामुळे बीज अंकुरण्यासाठी मदत होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नका पुरेसा पाऊस झाला की पेरणीला सुरुवात करा असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 लाख 35 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रमुख पिके हे कापूस सोयाबीन आणि तूर हे आहे. सोयाबीनचे चार लाख हेक्टर क्षेत्र, कापसाचे 1 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र, व तुर 85 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. या पेरणी साठी लागणारे बियाणे व खत पुरवठा हा जिल्ह्यात पुरेसा आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात असलेले सर्वच बियाणे व खते दर्जेदार आहे. सर्वच प्रकारचे बियाणे खते व आधुनिक हे वापरणे आवश्यक आहे.
आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागात कापसाची पेरणी ही ज्या ठिकाणी संरक्षण सिंचनाची सोय आहे अशा भागामध्ये कापसाची पेरणी केलेली आहे. 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहे त्या भागात सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

Previous articleअनोळखी व्हिडिओ काँल न उचलण्याचे युवा मराठा न्यूजचे आवाहन!
Next articleश्री ह.व्यां.प्र.मंडळा मध्ये 15 जून ला जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here