आशाताई बच्छाव
अनोळखी व्हिडिओ काँल न उचलण्याचे युवा मराठा न्यूजचे आवाहन!
मालेगाव (कार्यालयीन प्रतिनिधी)- आजकाल प्रत्येकाच्या घराघरात स्मार्टफोनने जागा घेतलेली आहे.आणि त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाटसअप हे असतेच असते.
त्यामुळे व्हाटसअप हाताळताना कधीही आपल्याला अनोळखी नंबरवरून व्हिडिओ काँल आला तर कधीच उचलू नका हे आवाहन युवा मराठा न्यूज जनहितार्थ करीत असून,अशा अनोळखी व्हिडिओ काँलला आपण अनावधानाने जर उचललेच तर समोरून काहीही दिसत नाही.आणि तुम्ही फक्त इकडून हँलो हँलो करीत असतात अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडिओ काँलच्या एका कोपऱ्यात एक अनोळखी व्यक्ती रोमान्स करताना दिसते.प्रसंगी कपडे उतरवताना दिसते बाकी समोरील व्हिडिओ काँल वरुन समोरुन कुठलाही आवाज येत नाही.
मग.. त्यानंतरच सुरू होते खरी खेळी तुम्हाला ब्लॅकमेल करायला सुरुवात होते हे सोशल मीडियावर सुरू असलेले फसवणूकीचे मोठे रँकेट असून जनतेने सावधानता बाळगावी असे युवा मराठा न्यूज परिवार आपणा सगळ्यांना कळकळीचे आवाहन करीत आहे.