Home नंदुरबार सटाणाहून गरीब महिला चालली होती घरी, रात्रीच्या अंधारात पिंपळनेरला दोन नराधमांनी तिच्यावर...

सटाणाहून गरीब महिला चालली होती घरी, रात्रीच्या अंधारात पिंपळनेरला दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून घडविली गुन्हेगारी!!

251
0

आशाताई बच्छाव

1000420715.jpg

सटाणाहून गरीब महिला चालली होती घरी, रात्रीच्या अंधारात पिंपळनेरला दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून घडविली गुन्हेगारी!!
क्राईम स्टोरी/ हेमंत जगताप नंदुरबार, राजेंद्र पाटील राऊत मालेगाव
पिंपळनेर:- ती गरीब व आदिवासी मावची समाजाची महिला दरवर्षी आपल्या कुटूबांसोबत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे कांद्याच्या खळ्यावर कामासाठी येत होती.यावर्षी सुद्धा ती आपल्या लहान मुलांसह सटाण्याला कांदा व्यापारीच्या खळ्यावर कामाला आलेली होती.घरची जेमतेम शेती असल्यामुळे त्या महिलेला दरवर्षी आपले गाव सोडून दूर सटाणा येथे कामाला यावे लागत होते, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून दरवर्षी सदरची महिला पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी सटाणा भागात यायची, यावर्षी बिचा-या गरीब महिलेने आपल्या लहानशा मुलांसोबत सटाणा येथे कांद्याच्या खळ्यावर काम करुन दोन पैसे कमावले आणि कामं बंद झाल्यावर दोघं माय लेकर आपल्या गावाच्या ओढीने २६ मे् रोजी एका अँपे रिक्षातून सटाणा येथून आपल्या गावाच्या दिशेने निघाले.रात्री ८ वाजेच्या सुमारास दोघं मायलेकर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर गावी पोहचले.त्यांना आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या गावी लवकरात लवकर पोहचायचे होते.पण गावाकडे जाण्यासाठी एकही वाहन मिळत नसल्याने ते दोघं मायलेक आपल्या जवळ असलेले सामानाचे गाठोडे व बोज्या घेऊन सामोडे व पिंपळनेर गावाच्या चौफूलीकडे गेले,निदान तेथे तरी वाहन भेटेल ही भाबडी अपेक्षा मनात ठेवून दोघं मायलेकर या चौफुलीवर आले.बराच वेळ झाला तरी एकही वाहन या मार्गाने जात नसल्यामुळे दोघं मायलेकांनी रात्रभर त्याच जागेवर झोपून घेण्याचा विचार केला,तेवढ्यात त्या रस्त्याने पांढ-या रंगाची पिवळी पीक अप व्हँन आली व त्यांनी त्या महिलेला व तिच्या मुलाला सांगितले की,कुठं जायचे आहे त्यावर त्या महिलेने सांगितले की, आम्हाला आमच्या गावी नवापूर तालुक्यात जायचे आहे आम्ही मावची आदिवासी समाजाचे आहोत तर त्या पांढ-या रंगाच्या पीक अप वाहनातून आलेल्या दोघा हरामखोरांनी सांगितले की, आता तुम्हाला गाडी भेटाणार नाही पुढे बैल बाजार आहे तेथे जाऊन झोपून घ्या.मात्र त्या स्वाभिमानी व आत्मविश्वासू महिलेने सांगितले की, आम्ही येथेच रात्रभर थांबून राहू पण कुठेही जाणार नाही.तेवढयात त्या त्या पीक अप वाहनचालकाने आपली गाडी पुढे काही अंतरावर नेऊन थांबविली.व थोड्या वेळानंतर त्या पीक अप वाहनात बसलेले दोघेही नराधम त्या सुनसान अंधारात परत त्या सामोडे चौफुलीवर आपल्या लेकरासोबत थांबलेल्या महिलेच्या दिशेने वाटचाल करुन आले. त्यातील एकाने त्या महिलेचा हात पकडला व तिला ओढण्याचा प्रयत्न करु लागला तर त्या महिलेच्या मुलाने त्या हात ओढणारेस विरोध केल्यावर दुसऱ्या सोबत असणा-या वाहनचालक नराधम मित्राने त्या लहानग्या मुलाला ढकलून देत त्याच्या आईला त्याच्याच डोळेदेखत ओढून नेले,व काही अंतरावर जाऊन त्या दोघा नराधम हरामखोरांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर संभोग केला.तोपर्यत मध्यरात्र झाली होती.त्या बिचाऱ्या आदिवासी महिलेला एकटीला वा-यावर सोडून तिचा उपभोग घेऊन हे हरामी तेथून लागलीच फरार झाले.मात्र धाडसी आदिवासी मावची महिला हिने पिंपळनेर पोलिस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची इत्यंभूत माहिती दिली . त्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपी निलेश निकम व त्याचा साथीदार स्वप्नील वाघ या दोघा नरा़माविरुध्द मोठ्या हिमतीने फिर्याद दाखल केली.पिपळनेर पोलिसांनी तातडीने तपास करून या दोघांही आरोपींना घोडयामाळ ता. साक्री जिल्हा धुळे येथून अटक केली.

Previous articleआदिवासीबहुल बागलाणमध्ये आदिवासीचा कल काँग्रेसकडे ?
Next articleखामखेडा येथील गिरणा नदीपात्रात मेंढपाळाचा बुडून मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here