आशाताई बच्छाव
निमगाव येथे संजय पाचपोर यांच्या प्रेरणेने सद्गुरु जोग महाराज गुरुकुल वारकरी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन
निशुल्क बालसंस्कार शिबिर 21 मे ते 9 जून पर्यंत राहणार
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा तालुक्यातील पहेला येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री दत्त मंदिर निमगाव येथे विदर्भ रत्न ह. भ .प. गुरुवर्य संजय महाराज पाचपोर ह्यांचे प्रेरणेने सदगुरू जोग महाराज गुरुकुल वारकरी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन रामदास शहारे ह्यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.निःशुल्क बालसंस्कार शिबिर 21 मे ते 9 जून पर्यंत राहणार आहे.शिबिराला मुले मुली उपस्थित आहेत .सकाळी 5 वाजता पासून रात्री 8/30 वाजता पर्यंत हरिपाठ,व्यायाम,संगीत,
तबला पेटी ताळ वाजवण्याची प्रशिक्षण,सुसंस्कार ची शिकवण दिली जाते.शिबिरात चंद्रपूर ,गडचिरोली ,नागपूर ,गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील शिविरार्थी आहेत.
बाल संस्कार शिबिराचा समारोप दिनांक 9 जून ला होईल व त्याचे सोबत गुरुकुल चे उद्घाटन होईल.गुरुकुल मध्ये 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी असतील विद्यार्थ्याना ह भ प ओमदेव चौधरी महाराज तीन आचार्य सोबत संगीत शिक्षक हे अध्यत्मिक् शिक्षण देणार तसेच गांधी विद्यालय पहेला येथे शालेय शिक्षण होणार.
मुलांना शाळेकडून ही शिक्षक गुरुकुल ला भेट देवून विशेष अभ्यासासाठी सहकार्य करणार.
निमगाव ह्या लहानशा गावात जे ठिकाण आंभोरा पासून जवळच असल्याने नागपूर वरून ही भरपूर लोक भेट देवून मुलांची ऍडमिशन करीत आहेत.
विद्यार्थ्यानं करिता निवासस्थान,वाचनालय,
प्रार्थना साठी श्री दत्त मंदिर,प्रशिक्षण हॉल,स्वयंपाक गृह,आचार्य निवासस्थान,पुरेसे प्रसाधन गृह खेळण्यासाठी मैदान,गाई शेती अशी व्यवस्था श्री संजय एकापुरे ह्यांनी 2 अकर शेतीवर गुरुकुल ला करून दिली आहे.सोबत गुरुकुल ला भरपूर भक्त मंडळी सहकार्य देत आहेत नितिन गायधने ह्यांनी वाचनालय साठी ग्रंथ,श्री अनिल जी डाँगरवार ह्यांनी मुलांना बसण्यासाठी म्याटिन कार्पेट असे साहित्य दिले.
विदर्भात ह्या प्रकारचे पहिले गुरुकुल असून खूप चांगला प्रतिसाद आहे.अश्या प्रकारचे शिक्षण देहू आळंदी येथे आहे.आता विदर्भ वासियांना असे शिक्षण सदगुरु जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे मिळणार आहे.
भविष्यात सर्व वारकरी भक्त मंडळी चे सहकार्याने देहू आळंदी सारखे ठिकाण हे निमगाव होणार असा विश्वास आहे
सद्गुरु जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर
सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराला प्रमुख पाहुणे ,सुजित जी कुंभारकर विभाग प्रचारक, संतोष रावजी एकापूरे(आधारस्तंभ देणारे) आवरकर गुरुदेव सेवा मंडळ , दत्ताभाऊ वानखेडे भंडारा वारकरी मंडळ, तानाजी गायधने गायत्री परिवार ,नितीन भाऊ गायधने ,अनिल भाऊ डोंगरवार डॉ,संजय एकापुरे,प्रदीपजी ढबाले(मार्गदर्शक) , काटेखाये , मुख्याध्यापक गांधी विद्यालय , संजय माने , राधेश्याम राठी, लुटे ,काटेखाये,, प्राध्यापक सुरज गोंडाने, राजीराम पुडके, परमानंद धुळसे, गुड्डू साकुरे ,अंबादास चवळे पोलीस पाटील, कृष्णाजी चवळे ,राजकुमार राऊत, वर्षा मिश्रा ,अनुराधा माने ,दिपक वानखेडे ,,कुलदीप गंधे व तसेच गावकरी, भक्त मंडळी ,शिक्षक वर्ग , पाल्य व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.