आशाताई बच्छाव
अमरावती विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च न्यायालय कोर्टात.
_________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती विद्यापीठ चे तत्कालीन प्रभारी अडचणीत कुलगुरू डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका नागपूर कोर्टात. अमरावती विद्यापीठ च्या वनस्पती शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने सुनावणी घेऊन न्यायनिवाडा करावा, अन्यथा १० जून रोजी न्यायालय अंतिम निकाल देईल, असे स्पष्ट केले आहे.डा. प्रशांत गावंडे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार सन२०२३ मध्ये १० सदस्य संख्या असलेल्या वनस्पती शास्त्र विषयाचा अभ्यास मंडळ मंडळाचे अध्यक्षपदींचा न्यू प्रक्रिया पार पडली या अध्यक्षपदासाठी डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रशांत गावंडे या दोघांनाही समान ५ मते पडली. त्यामुळे उपक्रम सचिव विक्रांत मालवीय यांनी ईश्वरचिठ्ठीचा निर्णय घेतला. यावेळी ईश्वरचिठ्ठीतून डॉ. प्रशांत गावंडे यांचे नाव बाहेर आले. तेव्हा डॉ. दिनेश खेडकर आपसुखच बाद झाले. असा समज झाला. मात्र, विद्यापीठ परिनियमानुसार ईश्वर चित्तूर ज्या व्यक्तीचे नाव येते ती व्यक्ती स्पर्धेतून बाद करावी लागते. मात्र, यावेळी डॉ. दिनेश खेडकर यांचे नावे चिठ्ठी निघाली नसताना डॉ. गावंडे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ही बाब नंतर लक्षात आली असता डॉ. दिनेश खेडकर समर्थकांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने डॉ. गावंडे यांच्या ऐवजी दिनेश खेडकर यांना अभ्यास मंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. तथापि या निर्णयाविरुद्ध डॉ. प्रशांत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५८२८/२०२३ नुसार भाव घेतली. तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना प्रतिवादी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी २ मे रोजी उच्च न्यायालयात तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना वारंवार नोटीस बजावून सुद्धा ते गैरहजर राहत असल्याबाबत कोर्टाने ताशेरे वढले. याप्रकरणी विद्यापीठ योग्य ती कारवाई करून१३ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशित केले आहे. त्यामुळे१३ मे रोजी या विषयावर सुनावणी होणार आहे. के न्यायालय दोन आठवड्यात म्हणजे १० जून रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वनस्पती शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा डॉ दिनेश खेडकर यांचे बाजूने निर्णय दिल्यास नुटा कुलसचिव वर आक्षेप घेईल आणि डॉ. गावंडे यांना कॉल दिला तर शिक्षण मंच जीव घेईल, अशाप्रकारे इकडे आड तिकडे विहीर, अशी कुर सचिवांची अवस्था झाली आहे .कुलगुरू नवीन असल्याने शिक्षक संघटनेच्या दबावात न येता कुलगुरूंनी सुनावनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विद्या परिषदचे राजकारण कुणाच्या पथ्यावर? डॉ. दिनेश खेडकर यांना विजय घोषित केल्यास विद्यापरिषद मधून व्यवस्थापन परिषदेवर २ सदस्य नानीत करण्याचा मार्ग सुकर होईल व व्यवस्थापन परिषद वर शिक्षण मंचाचे २ सदस्य जातील अकॅडमी मध्ये शिक्षण म्हणतात ते प्रबंध आहे. कुलसचिव कालावधी १७ मी रोजी संपत असल्याने निवडणुकीतील वेळ काढू कोणाचे हे शुक्ल कास्ट त्यांच्या मागे लागू शकते.