आशाताई बच्छाव
जागतिक महिला दिनानिमित्त…….
निराधारांना आधार – ज्योती राठोड
गजानन जिरापुरे
ब्युरो चीफ अमरावती
अमरावती जिल्ह्यातील एक अतिशय मनमिळाऊ स्वभामानी मागील तेरा वर्षापासून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या वयाच्या 31वर्षी पासून रस्त्यावर/उघड्यावर मंदिरा समोर बसस्टँड वर दावाखण्यासमोर चौकात खितपत पडलेल्या लोकांना मायेचा आधार देणाऱ्या
गरीबी दु:ख कष्ट वेदना शोषण अशा चक्रव्यूहात अडकलेल्या दलित पीडित शोषित वंचित बहुजन आदिवासी सर्वहारा कष्टकरी अल्पसंख्याक समाजातील मुक्या बहिऱ्या लुळ्या पांगळ्या अपंग मनोरुग्ण रोगी दुखग्रस्त उघड्यावर रस्त्यावर झोपणारे ,बस स्टँडवर ,रेल्वे स्टेशनवर झोपणारे ,मंदिराच्या बाहेर ओट्यावर, दवाखान्याच्या आवारात पटांगणात उन थंडी पाण्यात भिजणारे ,थंडीने कुडकुडत शेवटच्या घटका मोजणारे म्हातारे मायबाप बहिण भावांना भिक मागून जगणाऱ्या बेघर निराधारांना आपल्या हक्काच्या आधार शहरी बेघर निवारा केन्द्र बडनेरा येथे दाखल करून त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची त्यांच्या आरोग्याची औषधी पाण्याची काळजी घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची वसा घेतलेल्या पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या व्यवस्थापिका आदरणीय ज्योती राठोड मँडम म्हणजे दु:ख वेदना आणि कारुण्याचे प्रतिनिधित्व करणारी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेची लेक शोभून दिसतात.
हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ,अत्यंत कमी वयात सामाजिक जाणीवेने ओतप्रोत भरलेल्या ज्योती राठोड ह्या राजीव बसवनाथे सर यांच्या बेरोजगार पुरुष युवक युवती आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ‘ पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीशी ‘ जुळल्या गेल्यात आणि फार कमी कालावधीत संस्थेचा विश्वास संपादन करून एक विश्वस्त बनल्यात .
मागील बारा वर्षापूर्वी संस्थेचे संचालक संस्थापक अध्यक्ष राजीव बसवनाथे व सचिव ज्योती राठोड मँडम यांनी शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्र चालविण्याचा विचार महानगरपालिका अमरावती येथील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविला आणि महानगरपालिका अमरावती अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या ‘सेवा परमो धर्म ‘जन सेवा हीच इश्वर सेवा म्हणून चांगल्या गोष्टी चे लगेच स्वागत करुन तनतनधनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले नव्हे महानगरपालिका अमरावतीच्या सहकार्यानेच हा बडनेरा येथील आधार शहरी बेघर लोकांचा निवारा केंद्र सुरू आहे .आज या आधार केन्द्राला बारा वर्षे म्हणजे एक तपाचा काळखंड लोटला आहे.
या बारा वर्षाच्या काळात अनेक अडचणी समस्या आणि संकटातून मार्ग काढीत,अनेक मान्यवरांच्या विरोधाला तोंड देत
हा निवारा आजवर सुरळीत सुरू आहे .याचे एकमेव कारण ज्योती राठोड मँडम आणि बसवनाथे सरांचा मनमिळाऊ स्वभाव .हा सुंदर आणि स्वच्छ सद्गुणी स्वभाव संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला .या त्यांच्या चांगल्या सद्गुणी स्वभावामुळे शहरातीलच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातील महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना ,समाजसेवी संस्था ,महिला बचत गट,समाजसेवक समाजसुधारक होतकरू नवतरुण कार्यकर्ते या आधार केंद्र जुळले .अनेकांनी मदतीचे हात पुढे केले.आजही करीत आहेत.
दुसरे महत्त्वाचे असे की , शहरात कुणीही भिक्षेकरी दिसू नये ,भिक्षा मागणे ,आणि भिक्षा देणे हा कायदेशीर गुन्हा आहे असे आपल्या शहरातील चौकाचौकात नम्रपणे आवाहन करुन भिक्षेकरी आढळल्यास ,कुणी रस्त्यावर उघड्यावर अतिशय खराब अवस्थेत, गलितगात्र ,अत्यावस्थ स्थितीत आढळल्यास त्यांना आमच्या संस्थेशी संपर्क करुन किंवा आमच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्रात बिनधास्त आणून द्यावे .या आवाहनाला भरपूर प्रतिसाद म्हणून आमचा निवारा केंद्र लुळ्या पांगळ्या अंपग मुक्या बहिऱ्या आंधळ्या मनोरुग्ण रोगी वयोवृद्ध म्हातारे आजी आजोबा बहिण भावांनी भरगच्च भरले.या सर्वांनी सेवा करताना ज्योती रोठोड मँडम यांनी ना कधी आळस केला ,ना कधी किळस केली. त्यामुळे त्यांच्या कार्याचे करावे तितुके कौतुक कमीच आहे.
महापुरुषांच्या राष्ट्रसंताच्या विचार कार्याचे बोट धरून चालत असताना जे सोबत येतील आणि जे सोबत येणार नाहीत त्यांच्या शिवाय प्रामाणिकपणे सच्चा दिलाने गोरगरीब निराधाराना आधार द्यावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत त्याचा गंध सुंगधी बागेसारखा सभोवताल पसरावा यासाठी आपला जन्म झाला असल्याचे ज्योती राठोड मँडम सांगतात .त्या असेही सांगतात की ,आपण करीत असलेल्या या चांगल्या कार्याला उद्या चालून महाराष्ट्र शासनाचे ,केंद्र शासनाचे अनुदान मिळणार किंवा कदाचित अनुदान मिळणारही नाही, तरी पण आपल्यावर आभाळाची क्रुपा… धरतीमातेची पुण्याई…चंद्र सूर्याच्या आशीर्वादाने कुणी ना कुणी सावली धरेलच …कुणी ना कुणी मायबाप मदतीचे हात पुढे करतील…हा मला विश्वास आहे .
ज्योती राठोड मँडम सांगतात की,इथे कुणाची माय बेघर होउन आश्रयाला आली आहे .इथे कुणाचा बाप या बेघर निवाऱ्याला अंतिम घटका मोजत आहे. इथे कुणाची आंधळी बहिण…मुका बहिरा अपंग भाऊ ,मामा काका आत्या जिजीबाई राहायला आली आहे . यांची सेवा करण्यातच खरा आनंद मिळतो आहे .इथेच बुद्धाची येशूची करुणा आहे. महम्मद पैंगबराची हाक … राम क्रुष्णा प्रार्थना इथेच आहे .हा निवाराच आमचे मंदिर, मस्जिद, चर्चे ,गुरुद्वारा आहे …राऊळ, देऊळ ,अजिंठा, वेरुळ इथेच आहे.चारो धाम इथेच आहे.
पुढे
राठोड मँडम सांगतात
इथे या बारा वर्षात आम्ही अनेक व्याधीने ग्रस्त आजी आजोबांचे मरण पाहिले आहे. मी या हाताने जवळपास 23 आजी आजोबांना विधीवत अंत्यसंस्कार करुन अग्नी दिला आहे .वेदनेला दु:खाला जात धर्म पंथ नसतो .आम्ही धर्म जातीच्या पलिकडे जाऊन केवळ मानवसेवेचे व्रत घेतले आहे. आम्ही इथे धर्मासाठी जातीसाठी भांडत बसत नाही .आम्ही सत्तेपेक्षाही मोठी स्वप्न उराशी बाळगून आहोत. मी सांगितले पाहिजे की ,सत्तेसाठी काय भांडता सत्तेपेक्षाही मोठी व्हा ,आंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय ,वासराची गाय व्हा ,अनाथाची माय व्हा,निराधार आधार द्या ,भुकेल्यांना अन्न ,तहानलेल्यांना पाणी,आणि बेघरांना निवारा आसरा द्या. यातच आपली भलाई आहे
आधार केंद्र नसते तर
किती निराधारांचा
बेवारस
म्रुत्यु झाला असता
कित्येक आजी आजोबा
अन्न वस्त्र पाणी निवाऱ्याविणा
कुत्र्याची मौत मेले असते
या होमलेस बेघर दुभंगलेल्या जिवांना मंगलमयता
प्रदान करताना
कुठलेही भांडवल न करता
किंवा अवडंबर न माजविता
अविरत सेवा करण्याची
आम्ही शपथ घेतली आहे
बारा वर्षांपासूनचे
आमचे हे लहानशे स्वप्न
अनेक प्रकारातून ,
आकारत साकारत
आले आहे
अनेक
भाव भावनातून
आणि
मंगलमैत्रीतून
प्रवाहित झाले आहे.
राठोड मँडम सांगतात
माणसांचा देह म्रुत्यु नंतर
मातीमोल होतो
चला आपण या देहाला
आपल्या विचार संवाद मैत्री आणि विश्वासाने क्रुतीकार्याने
लोकांच्या गळ्यातला मोत्याचा
हार बनू या .
…